मनमाड ( प्रतिनिधी) - रेल्वे प्रशासनाने दक्षिण पूर्व मध्य रेल्वे च्या बिलासपूर विभागात रायगढ - झारसुगुडा दरम्यान चालू असलेल्या नॉन इंटरलॉकिंग कार्यामुळे भुसावळ मंडळातून जाणाऱ्या काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. काल सोमवारी दि. २१ सप्टेंबर ते १ अक्टोबर पर्यंत रेल्वे कार्य चालणार आहे. यामुळे बिलासपूरच्या दिशेने मनमाड जंक्शन वर थांबणाऱ्या गाडी नं .२२५११ लो.टि. टर्मिनस कामाख्या कर्मभूमी सुपरफास्ट एक्स्प्रेस ( २७ सप्टेंबर), १२८०९ मुंबई हावडा मेल ( २१ ते २८ सप्टेंबर) , १८०२९ लो.टि.टर्मिनस शालीमार एक्स्प्रेस ( २१ - २८ सप्टेंबर), १२८७९ लो.टि . टर्मिनस भुवनेश्वर विकली सुपरफास्ट एक्स्प्रेस ( २४,२८ सप्टेंबर व १ अक्टोबर) २२८६५ लो. टि. टर्मिनस पुरी विकली सुपरफास्ट एक्स्प्रेस ( २९ सप्टेंबर) ला गाड्या आता रद्द आल्या आहेत. प्रवाशांना पर्यायी गाड्याचा टिकट काढून प्रवास करावा लागणार आहे. ज्या प्रवाशांनी या गाड्याचे टिकटे अॉनलाईन काढली असेल त्यांना परतावा मिळेल, तर ज्यांनी काउंटर वरून काढले असतील त्यांना ही टिकीटांचे पैसे परत मिळणार आहे. मनमाड रेल्वे जंक्शन वरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आता या गाड्या साठी वाट पाहावी लागणार आहे. मनमाड रेल्वे स्टेशन वर प्रवास करणाऱ्या प्रवाशांची मोठी गर्दी असते.
Subscribe to:
Post Comments (Atom)
न्यू इंग्लिश विद्यालयात 'जागतिक महिला दिन' उत्साहात साजरा,
नांदगाव (प्रतिनिधी ) - नांदगाव येथील मविप्र समाज संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल मध्ये 'जागतिक महिला दिन' मोठ्या उत्साहात...
-
नांदगाव (प्रतिनिधी) - नांदगाव येथे गेल्या महिन्यात पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याने शहरातील आठ वर्षीय चिमुकला भावेश दिपक भ...
-
नांदगाव ( प्रतिनिधी ) - नांदगाव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूकीसाठी सोमवारी (दि.१७ ) शेवटच्या दिवशी नगराअध्यक्षपदासाठी ९ उमेदवार...
-
नांदगाव (प्रतिनिधी ) - उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र एच.एस.सी इयत्ता बारावी परीक्षा फेब्रुवारी / मार्च २०२५ मध्ये घेण्यात आल...
No comments:
Post a Comment