नांदगाव ( प्रतिनिधी) - नांदगाव शहरातील सबवेत पुन्हा वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. नांदगाव मध्ये सकाळी पाऊस ओसरल्याने या सबवेतून वाहने येण्यास सुरुवात झाली. या ठिकाणी गळती दिसून येते. मात्र मागील वर्षी जैसे पाणी तुंबले तसे चित्र यंदा नव्हते. रेल्वे गेट बंद केल्याने पर्यायी मार्ग सबवे सुरू करण्यात आला. गेल्यावर्षी इथे मोठ्या प्रमाणात पाऊसाचे पाणी तुंबले होते. या महापूरामुळे दुकानात, घरात पाणी शिरल्याने मोठे नुकसान करून गेले होते. पूराचे पाणी वाहू न शकल्याने यांचे दोष मटन मार्केट वर देण्यात आले. नंतरच्या काळात मटन मार्केट जेसीबी मशीन मदतीने जमीन दोस्त करण्यात आले. सबवेच्या वाहतूक कोंडी चा प्रश्न अनेकवेळा उपस्थित करण्यात आला पण प्रशासनाने यावर अजून ही दखल घेतली नाही. वाहन चालकांची यापासून सुटका कधी होणार असा नागरिक सवाल उपस्थित करत आहे. सबवेच्या अरूंद रस्त्यावर ट्रॅक्टर, इतर वाहने वळवताना मोठी कसरत करावी लागत असल्याने वाहनचालक संताप व्यक्त करत आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
न्यू इंग्लिश विद्यालयात 'जागतिक महिला दिन' उत्साहात साजरा,
नांदगाव (प्रतिनिधी ) - नांदगाव येथील मविप्र समाज संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल मध्ये 'जागतिक महिला दिन' मोठ्या उत्साहात...
-
नांदगाव (प्रतिनिधी) - नांदगाव येथे गेल्या महिन्यात पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याने शहरातील आठ वर्षीय चिमुकला भावेश दिपक भ...
-
नांदगाव ( प्रतिनिधी ) - नांदगाव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूकीसाठी सोमवारी (दि.१७ ) शेवटच्या दिवशी नगराअध्यक्षपदासाठी ९ उमेदवार...
-
नांदगाव (प्रतिनिधी ) - उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र एच.एस.सी इयत्ता बारावी परीक्षा फेब्रुवारी / मार्च २०२५ मध्ये घेण्यात आल...
No comments:
Post a Comment