Tuesday, September 20, 2022

आमदार सुहास कांदे यांनी मनमाड मध्ये केली नुकसानग्रस्त भागाची पाहणी ,

 
मनमाड (प्रतिनिधी )- नांदगाव तालुक्यात मुसळधार पाऊस कोसळल्याने मनमाड मध्ये रामगुळणा, पांझण नदीला मोठा पूर आला. मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळल्याने पूराचे पाणी घरात  शिरल्याने घरातील संसारपयोगी वस्तू मोठे नुकसान झाले. यांची माहिती मिळताच मनमाड मध्ये आमदार सुहास कांदे यांनी पूर परिस्थितीचा व नुकसानग्रस्त झालेल्या भागाची पाहणी केली. नुकसान झालेल्या भागाचे तात्काळ पंचनामे करण्याचे संबंधित अधिकाऱ्यांना सुचना दिल्या.  नांदगाव तालुक्याचे  आमदार सुहास आण्णा कांदे व अंजुमताई कांदे यांनी पूर आपत्तीग्रस्तांना भेट घेतली होती. तसेच पूर परिस्थितीची पाहणी केली. यावेळी तहसीलदार, मनमाड नगरपरिषद मुख्याधिकारी कृषी अधिकारी, आरोग्याधिकारी, PWD, पोलीस, पंचायत समिती चे अधिकारी वर्ग उपस्थित होता. 
   रामगुळणा, पांझण नदीला  पूर परिस्थितीमुळे आणि भविष्यात मोठी दुर्घटना घडू नये म्हणून या पुलाचे काम सुरू करण्यात येईल व या दोन्ही साठी 5 कोटी रुपये मंजूर केले असल्याचे आमदार सुहास कांदे यांनी सांगितले. आपत्ती ग्रस्थांशी बोलताना आमदार कांदेनी धीर दिला, मोठे नुकसान झालेल्या कुटुंबीय महिलांशी बोलतांना धीर देत सर्व संसार उपयोगी साहित्य व अन्न धान्य तात्काळ देणार असल्याचे जाहीर केले. याप्रसंगी शिवसेना कोअर कमिटी मनमाड शहर व महिला आघाडी तसेच मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

नांदगाव येथील जे.टी. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूलचा सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेत घवघवीत यश!

नांदगाव (प्रतिनिधी ) - नांदगाव येथील जे. टि. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांचा CBSE केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंड...