खुनाचा गुन्हा सिद्ध झाल्याने जन्मठेप व दाेन हजार रुपये दंड, सरकारी कामात अडथळा आणल्याने दाेन वर्षे कारावास, हजार रुपये दंड व दंड न भरल्यास सहा महिने कारावास, धमकावल्याच्या आराेपाखाली सात वर्षे शिक्षा तसेच हजार रुपये दंड व दंड न भरल्यास सहा महिने कैद अशी शिक्षा दोषींना सुनावण्यात आली. सीआयडीचे वकील नमाज चालन यांनी सरकारी पक्षाची बाजू मांडली. आरोपींच्या वतीने वकील राहुल कासलीवाल व सागर गरुड यांनी काम पाहिले.
Friday, September 9, 2022
अप्पर जिल्हाधिकारी यशवंत सोनवणे जळीतकांड प्रकरणी तिनही आरोपींना जन्मठेपेची शिक्षा,
मनमाड( प्रतिनिधी) - महाराष्ट्र सह देशाला हादरवून सोडणाऱ्या मनमाड जवळील पानेवाडी शिवारात अप्पर जिल्हाधिकारी यशवंत सोनवणे यांच्या अंगावर रॉकेल टाकून जळीतकांड घटना घडली होती. या जळीतकांडाची सुनावणी न्यायालयात पार पडली. यात मालेगावचे तत्कालीन अपर जिल्हाधिकारी यशवंत साेनवणे जळीतकांड खटल्यातील तीन आराेपींना मालेगाव अपर व सत्र न्यायालयाने गुरुवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. इतर दाेन गुन्ह्यांमध्येही तिघांना दाेषी ठरवण्यात आले. घटनेच्या ११ वर्षांनंतर या खटल्याचा निकाल लागला. राजेंद्र देवीदास शिरसाठ ऊर्फ राजू, मच्छिंद्र पिराजी सुराडकर ऊर्फ कचरू व अजय मगन साेनवणे (सर्व रा. मनमाड) अशी शिक्षा सुनावलेल्या नावे आहेत. प्रजासत्ताकदिनाच्या पूर्वसंध्येला २५ जानेवारी २०११ रोजी मनमाडजवळील पानेवाडी शिवारात इंधन भेसळ अड्ड्यावर छापा टाकण्यास गेलेले यशवंत साेनवणे यांना पाेपट शिंदे व त्याच्या साथीदारांनी अंगावर राॅकेल टाकून जिवंत जाळण्यात आले हाेते. यात मुख्य संशयित पाेपट हादेखील भाजला , काही दिवसांनी मुंबईत उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला हाेता. या प्रकरणात मनमाड पाेलिसांनी पाेपट शिंदे, कुणाल शिंदे, विकास शिंदे, दीपक बाेरसे, राजेश शिरसाठ, सीताराम भालेराव, मच्छिंद्र सुराडकर यांच्यासह अकरा जणांवर गुन्हा दाखल केला हाेता. कुणाल शिंदे अल्पवयीन असल्याने त्याचा खटला बालन्यायालयात सुरू हाेता. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता सरकारने या खटल्याचा तपास सीबीआयकडे साेपवला हाेता. सीबीआयने तपास पूर्ण करत तिघांविराेधात आराेपपत्र दाखल केले हाेते. खटल्याच्या सुनावणीत अपर व जिल्हा सत्र न्यायाधीश डी. वाय. गाैड यांनी तिघांना दाेषी ठरवले.
Subscribe to:
Post Comments (Atom)
नांदगाव नगरपरिषदेच्या विविध विषय समित्यांच्या सभापती व सदस्यांची निवड,
नांदगाव (प्रतिनिधी ) - येथील नांदगाव नगरपरिषदेच्या विविध विषय समित्यांच्या सभापती व सदस्य निवडीसाठी नगरपरिषद कार्यालयात विशेष सभ...
-
नांदगाव (प्रतिनिधी) - नांदगाव येथे गेल्या महिन्यात पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याने शहरातील आठ वर्षीय चिमुकला भावेश दिपक भ...
-
नांदगाव ( प्रतिनिधी ) - नांदगाव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूकीसाठी सोमवारी (दि.१७ ) शेवटच्या दिवशी नगराअध्यक्षपदासाठी ९ उमेदवार...
-
नांदगाव (प्रतिनिधी ) - उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र एच.एस.सी इयत्ता बारावी परीक्षा फेब्रुवारी / मार्च २०२५ मध्ये घेण्यात आल...
No comments:
Post a Comment