मनमाड(विशेष प्रतिनिधी):- मनमाड येथील संत बार्णबा चर्च मध्ये हंगामाचा सण(उपकार स्तुती दान) मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला शहरातील ख्रिस्ती बांधवांनी आज हंगामातील पहिले धान्य फळ प्रभू येशुला अर्पण करत हा सण साजरा केला यावेळी संत बार्णबा चर्चचे मुख्य पाळक रेव्हेरेंट फिलिप वरा यांनी प्रार्थना करत सर्व धान्य पालेभाज्या फळे आशिर्वादित केले यानंतर या सर्व वस्तुंची विक्री करून मिळणारे पैसे हे चर्चला दान म्हणुन देण्यात आले.
नाताळचा सण साजरा करण्याअगोदर नोव्हेबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात हा हंगामाचा सण साजरा करण्याची गेल्या अनेक वर्षांची आगळीवेगळी परंपरा असून दर वर्षी प्रमाणे यंदा ही आज (रविवार) चर्चच्या आवारात हंगाम सण (उपकार स्तुती दान) म्हणून हा सण साजरा करण्यात आला.मनमाड शहरातील कॅम्प परिसरात असलेला संत बार्णबा चर्च हा इंग्रजांच्या काळात बांधलेला आहे त्यावेळी कॅम्प भागात मोठ्या प्रमाणात इंग्रज राहत होते प्रथानेसाठी त्यांनी हा चर्च बांधल्याचे वयवृद्ध लोक सांगतात हा चर्च ब्रिटीश कालीन असल्याने तो सर्वात जुना मानला जातो.या चर्च मध्ये गेल्या अनेक वर्षा पासून नोव्हेबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात वार्षिक हंगामाचा सण साजरा करण्याची प्रथा असून त्याला धर्मिक महत्व देखील आहे दरवर्षीप्रमाणे यंदा ही आज रविवारची सामुहिक प्रार्थना झाल्यानंतर चर्चच्या आवारात हा सण साजरा करण्यात आला. त्यात कोंबडी पासून बोकड पर्यंत,अन्न धान्य पासून भाजीपाला पर्यंत यासह इतर सर्व खाद्य पदार्थ आणि विविध वस्तूंची दुकाने थाटण्यात आली होती या आगळ्यावेगळ्या वस्तू खरेदीसाठी ख्रिश्चन बांधवांची झुंबड उडाली होती.विशेष म्हणजे इतर बाजार प्रमाणे या बाजारात वस्तूंची विक्री केली जात नाही तर त्यांचा लिलाव केला जातो.लिलावातून मिळणारी रक्कम समाजउपयोगी कामासाठी वापरली जात असल्याने समाज बांधव जास्तीत जास्त बोली लावून वस्तू खरेदी करतात.या बाजाराचे संयोजन चर्चचे पाळक रेव्हेरेंट फिलिप वरा,सेक्रेटरी शैलेश जाधव,खजिनदार मनीष अहिर, चर्च कमिटी सदस्य निलेश सपकाळे,प्रशांत केदारी,अरुण मोहन,विश्वास बत्तीसे, आशिष चर्वतूर, राजु शिंदे,सीमा देठे,सुमन रणदिवे,कल्याणी कदम,प्रमिला देठे,सचिन पवार यांच्यासह सदस्य आणि समाज बांधवांनी केले होते.
No comments:
Post a Comment