नांदगाव (प्रतिनिधी) - नांदगाव शहरातील सौ .कमलाबाई माणिकचंद कासलीवाल प्राथमिक विद्यालयाच्या विद्यार्थी दैनंदिन व्यवहारात पारंगत व्हावे तसेच कायदा व सुव्यवस्था यांची माहिती विद्यार्थ्यांना मिळावी या उद्देशाला अनुसरून विद्यार्थ्यांना पोस्ट ऑफिस ला भेट देऊन तेथील कामकाज कसे चालते याविषयी माहिती जाणून घेतली. डाक सहाय्यक दत्तात्रय भावसार यांनी विद्यार्थ्यांना टपाल कार्यालयातील कामकाज कशाप्रकारे चालते याविषयी माहिती सांगितली. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष टपाल कार्यालयातील व्यवहार कसा चालतो याविषयी माहिती मिळावी या उद्देशाने विद्यार्थ्यांना प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक व्ही.पी. सावंत यांनी डाक कार्यालयाला विद्यार्थ्यांची भेट घडवून आणली.या भेटीत विद्यार्थ्यांनी आपले काही प्रश्न सुद्धा विचारले आणि आपले ज्ञान वृद्धिंगत केले. तसेच गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा बसण्यासाठी व मुलांना सुरक्षिततेची जाणीव होण्यासाठी आणि शस्त्रांची माहिती मिळावी यासाठी पोलीस स्टेशन येथे क्षेत्रभेट देण्यात आली. तेथे सहाय्यक पोलीस निरीक्षक ईश्वर पाटील यांनी विद्यार्थ्यांना शस्त्रांची अतिशय उपयुक्त माहिती सांगितली तसेच रायफल चालवण्याचे प्रात्यक्षिक देखील करून दाखविले तेथे उपस्थित मोरेदादा यांनी विद्यार्थ्यांना सत्याच्या मार्गावर चालण्याची शिकवण दिली. तसेच पोलिस कर्मचारी सोनवणे , मुंडे यांनी सहकार्य केले .शाळेने राबवलेल्या या कार्यक्रमाचे संस्थेचे चेअरमन सुनिलकुमार कासलीवाल,सचिव विजय चोपडा,प्रशासक प्रकाश गुप्ता,सरचिटणीस प्रमिलाताई कासलीवाल,संचालक महेंद्र चांदिवाल,मुख्याध्यापक व्ही.पी .सावंत यांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सिध्दार्थ जगताप,ईश्वर फणसे,अभिजित थोरात,विजय जाधव,श्रीमती. धन्वंतरी देवरे,निलोफर पठाण,जयश्री चोळके,अनिता पवार,वैशाली शिंदे,यांनी विशेष परिश्रम घेतले.
Subscribe to:
Post Comments (Atom)
नांदगावच्या कासलीवाल प्राथमिक विद्यालयात वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात संपन्न ! विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबत खेळाकडे गांभीर्याने पाहण्याची काळाजी गरज,
नांदगाव (प्रतिनिधी ) - शिक्षणाच्या जोडीला आरोग्य, शिस्त आणि आत्मविश्वासाचे संस्कार रुजविणाऱ्या क्रीडांगणावर, श्री....
-
नांदगाव (प्रतिनिधी) - नांदगाव येथे गेल्या महिन्यात पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याने शहरातील आठ वर्षीय चिमुकला भावेश दिपक भ...
-
नांदगाव ( प्रतिनिधी ) - नांदगाव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूकीसाठी सोमवारी (दि.१७ ) शेवटच्या दिवशी नगराअध्यक्षपदासाठी ९ उमेदवार...
-
नांदगाव (प्रतिनिधी ) - उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र एच.एस.सी इयत्ता बारावी परीक्षा फेब्रुवारी / मार्च २०२५ मध्ये घेण्यात आल...
No comments:
Post a Comment