नांदगाव ( प्रतिनिधी) - नांदगाव शहरातील मुख्य स्मशानभूमीपर्यंत जाण्यासाठी पूल नसल्याने पावसाळ्यात अंत्यविधी करण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. गेल्या अनेक वर्षांपासून शाकंबरी नदीवर पूल व्हावा, अशी मागणी केली असून, 'तुम्ही-आम्ही नांदगावकरां'च्या वतीने अभिनव पद्धतीने प्रतीकात्मक तिरडी यात्रा काढत सरनावर बसून जनआक्रोश आंदोलन करण्यात आले.
यावेळी रखडलेल्या पुलाचे काम त्वरित सुरू करावे, प्रशासनाचा धिक्कार असो.. अशा घोषणांनी परिसर दणाणला होता. स्मशानभूमी रस्त्यावर विसावापर्यंत प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली.
विसाव्याजवळ प्रतीकात्मक तिरडी उतरवून आंदोलनही करण्यात आले. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता राहुल चोळके यांनी सांगितले की, ५६ खेडी योजनेची पाइपलाइन अडथळा ठरत असल्याने संबंधित विभागाकडे पाइपलाइन स्थलांतर करण्यासाठी निधी उपलब्ध नसल्याने पुलाचे काम थांबले आहे.
याप्रसंगी आमदार सुहास कांदे यांचे प्रतिनिधी म्हणून सुनील जाधव व सागर हिरे यांनी सांगितले की, ५६ खेडी योजनेच्या पाइपलाइन स्थलांतरासाठी आमदार निधीतून निधी उपलब्ध करून दिला जाणार असल्याचे सांगितले. आंदोलनात नांदगावकर यावेळी उपस्थित विजय पाटील, संतोष गुप्ता, वाल्मिक टिळेकर, जगताप सर, विशाल वडघुले, प्रवीण सोमासे, सागर आहेर, विकास भावसार, अवि महाजन, शरद महाजन, मधुकर खैरनार, श्रावण आढाव, अशोक पाटील, बाळासाहेब देहाडराय, समाधान आहेर, बापू वडाळकर, राजाराम खैरनार, ज्ञानेश्वर गांगुर्डे, प्रकाश चव्हाण, पंडित गायकवाड, अर्जुन गायकवाड, निंबा वडाळकर, बापू सोमासे, नांदगावकर सहभागी झाले होते.
No comments:
Post a Comment