मांडवड, नांदगाव (प्रतिनिधी) - नाशिक जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज,संचलित स्व.शरद आण्णा आहेर जनता विद्यालय,मांडवड शाळेत क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे,जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक,तालुका क्रीडा अधिकारी कार्यालय नांदगाव व स्व.शरद आण्णा आहेर जनता विद्यालय,मांडवड यांच्या संयुक्त विद्यामाने नांदगाव तालुकास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं होतं.याप्रसंगी नांदगाव तालुक्याचे पंचायत समितीचे गट विकास अधिकारी गणेश चौधरी, नांदगाव पोलीस स्टेशनचे ए.पी.आय. ईश्वर पाटील, मांडवड गावचे ज्येष्ठ नेते विठ्ठल आहेर, शिवबा ग्रुपचे संस्थापक अशोक भाऊ निकम, संस्थेचे सभासद प्रशांत आहेर,रामराव मोहिते,प्रकाश आहेर,वाल्मीक थेटे हे या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. सदर कबड्डी स्पर्धेमध्ये वय वर्षे 14,17,19 वयोगटातील तालुक्यातील मुलांचे 55 संघाने यावेळी या स्पर्धेत सहभाग नोंदवला. उत्कृष्ट आयोजनामुळे स्पर्धेला अधिकच रंगत या ठिकाणी दिसून आली. या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख उपस्थिती असलेले गट विकास अधिकारी गणेश चौधरी यांनी उद्घाटनाप्रसंगी विद्यार्थ्यांना खेळाडू वृत्ती जोपासण्याचे आव्हान केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती कांबळे एस. एस.यांनी केले.नांदगाव तालुका म.वि.प्र.संचालक अमित बोरसे पाटील यांनी क्रीडा स्पर्धेला शुभेच्छा दिल्या व उत्कृष्ट आयोजनाबद्दल मुख्याध्यापक व क्रीडाशिक्षक संदीप आहेर व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे कौतुक केले. 14 वर्षे आतील मुलांच्या स्पर्धेमध्ये व्ही.एन.नाईक हायस्कूल वेहेळगाव संघ प्रथम क्रमांक तर सेंट झेवियर हायस्कूल मनमाडच्या संघाने द्वितीय क्रमांक मिळविला,17 वर्षा आतील मुलांच्या कबड्डी स्पर्धेमध्ये कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय नांदगाव संघाने प्रथम क्रमांक तर छत्रे हायस्कूल मनमाडच्या संघाने द्वितीय क्रमांक मिळविला,19 वर्षातील मुलांच्या स्पर्धेमध्ये महात्मा गांधी जुनियर कॉलेज मनमाड च्या संघाने प्रथम क्रमांक मिळविला तर द्वितीय क्रमांक जनता विद्यालय भालूर या संघाने मिळविला दुसऱ्या दिवशी झालेल्या तालुकास्तरीय मुलींच्या कबड्डी स्पर्धेमध्ये 14 वर्षे वयोगटांमध्ये जनता विद्यालय जातेगाव प्रथम क्रमांक तर क.मा.का.विद्यालय नांदगाव द्वितीय क्रमांक मिळविला 17 वर्षे वयोगटांमध्ये प्रथम क्रमांक स्व शरद आण्णा आहेर जनता विद्यालय मांडवड तर द्वितीय क्रमांक व्ही. जे.हायस्कूल नांदगाव संघाने मिळविला 19 वर्षातील मुलींच्या अंतिम सामन्यांमध्ये कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय नांदगावच्या संघाने प्रथम क्रमांक तर महात्मा गांधी जुनिअर कॉलेज मनमाडच्या संघाने द्वितीय क्रमांक मिळविला तिन्ही गटातील विजेत्या स्पर्धकांना ट्रॉफी गुलाबपुष्प देऊन गौरविण्यात आले व उपस्थित सर्व मान्यवरांनी नाशिक येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्र तिन्ही संघांना शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप आहेर यांनी केले तर स्पर्धा यशस्वी करण्यासाठी संजय त्रिभुवन सुधाकर कातकडे यांच्यासह सर्व क्रीडा शिक्षकांनी पंच म्हणून कामकाज बघितले स्पर्धा आयोजनासाठी स्व शरद अण्णा आहेर जनता विद्यालय मांडवडच्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले स्पर्धा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडल्या.
Subscribe to:
Post Comments (Atom)
नांदगावच्या कासलीवाल प्राथमिक विद्यालयात वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात संपन्न ! विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबत खेळाकडे गांभीर्याने पाहण्याची काळाजी गरज,
नांदगाव (प्रतिनिधी ) - शिक्षणाच्या जोडीला आरोग्य, शिस्त आणि आत्मविश्वासाचे संस्कार रुजविणाऱ्या क्रीडांगणावर, श्री....
-
नांदगाव (प्रतिनिधी) - नांदगाव येथे गेल्या महिन्यात पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याने शहरातील आठ वर्षीय चिमुकला भावेश दिपक भ...
-
नांदगाव ( प्रतिनिधी ) - नांदगाव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूकीसाठी सोमवारी (दि.१७ ) शेवटच्या दिवशी नगराअध्यक्षपदासाठी ९ उमेदवार...
-
नांदगाव (प्रतिनिधी ) - उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र एच.एस.सी इयत्ता बारावी परीक्षा फेब्रुवारी / मार्च २०२५ मध्ये घेण्यात आल...
No comments:
Post a Comment