मनमाड(विशेष प्रतिनिधी):- सध्याच्या परिस्थितीत विद्यार्थी आपला जास्तीत जास्त वेळ मोबाईलमध्ये घालवतात हे त्यांच्या दृष्टीने घातक असुन अभ्यासा बरोबर मैदानी खेळ खेळण्यासाठी वेळ देऊन आपली बौद्धिक तसेच शारीरिक क्षमता वाढवणे गरजेचे आहे असे मत पत्रकार आमिन शेख यांनी सेंट झेवीयर हायस्कूल येथे व्यक्त केले वार्षिक क्रीडा महोत्सव निमित्ताने उदघाटक तसेच प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना खेळ आपल्या आयुष्यातील महत्वाचा भाग असुन याकडे जास्तीत जास्त लक्ष देण्याची गरज असल्याचे सांगितले. यावेळी मंचावर मुख्याध्यापक
माल्कम नातो, सिस्टर ज्योत्स्ना, प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ अर्चना निकाळे मॅडम, मनमाड चर्चचे धर्मगुरू सन्माननीय फादर सहायराज,संत झेवियर इंग्लिश मिडीयमचे मुख्याध्यापक श्री रॉल्फी सर, पी टी ए संघाचे उपाध्यक्ष श्री संजय बोरसे, एसएमसीच्या प्राधिकरण अधिकारी सौ. पुष्प लताताई मोरे, माता पालक संघाच्या उपाध्यक्ष सौ.शुभदा वाघ , दक्षता समितीच्या उपाध्यक्ष श्रीमती आशा वाघ, करुणा हॉस्पिटलच्या सुपीरियर सिस्टर रोज,करुणा नर्सिंग स्कूलच्या प्राचार्या सिस्टर जिशा आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
सुरुवातीला आमिन शेख यांनी क्रीडा ध्वजाचे रोहण आणि क्रीडा ज्योतीचे प्रज्वलन केले.त्यानंतर शालेय विद्यार्थ्यांनी गटनिहाय संचलन करून उपस्थित मान्यवरांना मानवंदना दिली. प्रणव देवकर या विद्यार्थ्याने खेळाडूंना खेळाची शपथ दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ जयश्री पारखे मॅडम व हेमंत वाले सर यांनी केले. आभार प्रदर्शन सौ.एलिझाबेद शेल्टे मॅडम यांनी केले. याप्रसंगी स्वप्निल बाकळे व अजिंक्य जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली मुलींनी रिबिन कवायतीचे उत्कृष्ट प्रात्यक्षिक सादर केले तर सुधाकर कातकडे सरांच्या मार्गदर्शनाखाली शालेय लेझीम पथकाने विविध रचना सादर करून उपस्थितांची मने जिंकली. मुख्याध्यापक फादर माल्कम नातो व सिस्टर ज्योत्स्ना यांच्या हस्ते उपस्थित सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. प्रमुख पाहुण्यांची ओळख प्रकाश नान्नोर सरांनी करून दिली. त्यानंतर क्रीडा महोत्सवाचे मार्शल सुधाकर कातकडे सर यांच्या देखरेखीखाली व सर्व शिक्षकांच्या सहकार्याने क्रीडा महोत्सव अंतर्गत लांब उडी, उंच उडी, गोळाफेक, थाळीफेक, धावणे, लंगडधाव ,दोरीवरील उड्या, भालाफेक, रिले माजी विद्यार्थ्यांसाठी धावण्याच्या स्पर्धा आदी स्पर्धा संपन्न झाल्यात. यशस्वी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. या क्रीडा महोत्सवासाठी पालक आणि माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment