नांदगाव (प्रतिनिधी)- तालुका क्रीडा कार्यालय नांदगाव यांच्या वतीने 14 17 19 वर्षातील मुला मुलींच्या तालुकास्तरीय शालेय मैदानी स्पर्धा नुकत्याच कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयाच्या मैदानावर घेण्यात आल्या याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंडळाचे संस्थापक अध्यक्ष नांदगाव चे नगराध्यक्ष राजेश कवडे यांनी विद्यार्थ्यांनी आपल्या शालेय जीवनामध्ये खेळात सहभागी झाल्यावर शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक असा सर्वांगीण विकास हा खेळामुळेच शक्य होतो असे प्रतिपादन केले व सहभागी विद्यार्थी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. 100, 200, 400, 800,1500 ,3000, 5000 मीटर धावणे लांब उडी उंच उडी थाळीफेक गोळा फेक भालाफेक या विविध स्पर्धा या ठिकाणी घेण्यात आल्या जवळपास 900 विद्यार्थी खेळाडूंनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदविला. मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे संचालक अमित पाटील यांनी विजयी खेळाडूंना जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी जनता विद्यालय जातेगाव चे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर चव्हाण, संजय त्रिभुवन, सुधाकर कातकडे, ताडगे एस.आर, आहेर बी.एम, काळे आर्.बी यांच्यासह तालुक्यातील सर्व क्रीडा शिक्षकांनी यशस्वी रित्या स्पर्धा पार पाडल्या, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप आहेर यांनी केले.
Subscribe to:
Post Comments (Atom)
नांदगाव येथील जे.टी. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूलचा सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेत घवघवीत यश!
नांदगाव (प्रतिनिधी ) - नांदगाव येथील जे. टि. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांचा CBSE केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंड...
-
नांदगाव (प्रतिनिधी) - नांदगाव येथे गेल्या महिन्यात पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याने शहरातील आठ वर्षीय चिमुकला भावेश दिपक भ...
-
नांदगाव ( प्रतिनिधी ) - नांदगाव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूकीसाठी सोमवारी (दि.१७ ) शेवटच्या दिवशी नगराअध्यक्षपदासाठी ९ उमेदवार...
-
नांदगाव ( प्रतिनिधी ) - नांदगावच्या लक्ष्मीनगर जवळील ढासे मळा येथील शाळा काही दिवसातच सुरू होत आहे . त्या निमित्ताने सामाजिक ...
No comments:
Post a Comment