नांदगाव ( प्रतिनिधी) - आज दि. १ डिसेंबर रोजी औद्योगिक प्रशिक्षण संस्था सातपूर येथे जिल्हास्तरीय तंत्रप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.नाशिक सह जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचा आयटीआय चा समावेश होता. यामध्ये विविध व्यवसायातील प्रशिक्षणार्थीं आणि निदेशकांनी आपल्या व्यवसायाच्या अनुरूप विविध *मॉडेलचे* प्रदर्शन करण्यात आले होते त्यात नांदगाव आयटीआय येथून संस्था स्तरावर निवड झालेल्या तीन प्रोजेक्टचे जिल्हास्तरीय साठी निवड करण्यात आली होती. त्यामध्ये रेल्वे प्लॅटफॉर्मवर तसेच विविध मॉलमध्ये आणि घरगुती कामात वापरल्या जाणाऱ्या टाइल्स क्लिनर या "मॉडेलचे" नांदगाव आयटीआय चे संध्याता व्यवसायाची प्रशिक्षणार्थीनी दिवस-रात्र मेहनत घेऊन कमी कालावधीत या संस्थेचे प्रभारी प्रभारी गटनिर्देशक श्री पी.डी.राठोड, जोडारी व्यवसायाचे श्री पी. एस. गायकवाड तसेच संधाता व्यवसायाचे शिल्प निदेशक श्री एस. टी. शिंदे सर यांच्या मार्गदर्शनाखाली या मॉडेलची निर्मिती करण्यात आली होती. मॉडेलची निर्मिती करून या मॉडेलची जिल्हा तंत्र प्रदर्शन निवड समितीने उत्तेजनार्थ बक्षीस देऊन विभागीय तंत्र प्रदर्शनासाठी निवड करण्यात आली. नांदगाव आयटीआय चे मार्गदर्शक ,शिल्प शिल्प निदेशक व प्रशिक्षणार्थींचे सर्वत्र भरभरून कौतुक होत आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
नांदगावच्या कासलीवाल प्राथमिक विद्यालयात वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात संपन्न ! विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबत खेळाकडे गांभीर्याने पाहण्याची काळाजी गरज,
नांदगाव (प्रतिनिधी ) - शिक्षणाच्या जोडीला आरोग्य, शिस्त आणि आत्मविश्वासाचे संस्कार रुजविणाऱ्या क्रीडांगणावर, श्री....
-
नांदगाव (प्रतिनिधी) - नांदगाव येथे गेल्या महिन्यात पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याने शहरातील आठ वर्षीय चिमुकला भावेश दिपक भ...
-
नांदगाव ( प्रतिनिधी ) - नांदगाव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूकीसाठी सोमवारी (दि.१७ ) शेवटच्या दिवशी नगराअध्यक्षपदासाठी ९ उमेदवार...
-
नांदगाव (प्रतिनिधी ) - उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र एच.एस.सी इयत्ता बारावी परीक्षा फेब्रुवारी / मार्च २०२५ मध्ये घेण्यात आल...
No comments:
Post a Comment