नांदगाव (प्रतिनिधी) - महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक संचालनालय पुणे तसेच नंदुरबार जिल्हा किडा अधिकारी व क्रिडा परिषद यांच्या संयुक्त विदयमाने विभागीय शालेय किक बॉक्सिंग आणि वुशू हया क्रिडा स्पर्धा दि. २०.१२.२०२२ आणि २२.१२.२०२२ रोजी संपन्न झाल्या. या विभागीय क्रीडा स्पर्धेत नांदगाव च्या कनिष्ठ महाविदयालयाचा मुलीचा संघ सहभागी झाला होता. या स्पर्धेत माधुरी ठोबरे विजयी झाली प्रथम क्रमांकामुळे तीची बुलढाणा येथे होणाऱ्या राज्यस्तरीय शालेय किक बॉक्सिंग व वुशु स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
वरील खेळाडु विदयार्थिनीचे म. वि. प्र. संचालक अमित बोरसे यानी हार्दिक अभिनंदन केलं. महाविदयालयाचे प्राचार्य डॉ. एस. एन. शिंदे यानी विदयार्थिनी व पालकाचे सत्कार केला विदयार्थिनीस पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच सर्व कनिष्ठ महाविदयालयातील जेष्ठ शिक्षक व शिक्षकेत्तर सेवकांनी विदयार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन केले आहे. खेळाडु विदयार्थिनीस योग्य व तांत्रिक मार्गदर्शन ज्युनिअर कॉलेज चे उपप्राचार्य व क्रिडा विभाग प्रमुख डी. एम . राठोड, सिनिअर महाविदयालयाचे क्रीडा संचालक आर. डी. वडजे सरांचे मार्गदर्शन लाभले.
No comments:
Post a Comment