मांडवड, ता. नांदगाव ( प्रतिनिधी) - नाशिक च्या स्व. मीनाताई ठाकरे विभागीय स्टेडियम येथे नुकत्याच संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धा यामध्ये १७ वर्षे मुलींच्या गटांमध्ये जनता विद्यालय मांडवड नांदगाव या संघाने अतिशय उत्कृष्ट कामगिरी करीत जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक मिळवला. पहिल्या साखळी सामन्यामध्ये त्रंबकेश्वर संघाला दहा गुणांनी पराभूत केले येवला संघाला बारा गुणांनी पराजित करून विजयाची घोडदौड पुढे सुरू ठेवून सेमी फायनल मध्ये प्रवेश निश्चित केला. सेमी फायनल मध्ये चांदवड तालुक्याचा बारा गुणांनी दणदणीत पराभव करून अंतिम सामन्यामध्ये आपला प्रवेश निश्चित केला. नांदगाव नाशिक या तालुक्यांमध्ये झालेला अंतिम सामन्यांमध्ये नाशिक संघाने नांदगाव संघाला सात गुणांनी पराभूत केले.ज्योस्तना आहेर ,कर्णधार, साक्षी आहेर,वैष्णवी पिंगळे, श्रुती आहेर, श्रुती वाडेकर, वैष्णवी दरगुडे, ईश्वरी आहेर, शुभांगी चोळके ,आशा आहेर,कावेरी महाडिक,हर्षदा मोहिते या खेळाडूंनी अतिशय सुंदर खेळ करीत जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये उपविजेतेपद प्राप्त केले, या खेळाडूंना मार्गदर्शन करणारे क्रीडाशिक्षक श्री संदीप आहेर,गणेश गुरखा या सर्वांचे यशाबद्दल सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस मा श्री नितीन भाऊ ठाकरे, तालुका संचालक श्री अमित भाऊ बोरसे पाटील, विठ्ठल आबा आहेर, व्यंकट आहेर, प्रशांत आहेर, अशोक निकम, मुख्याध्यापिका श्रीमती कांबळे एस.एम, यांच्यासह सर्व शिक्षक व ग्रामस्थ यांनी या खेळाडूंचे अभिनंदन केले.
Subscribe to:
Post Comments (Atom)
न्यू इंग्लिश विद्यालयात 'जागतिक महिला दिन' उत्साहात साजरा,
नांदगाव (प्रतिनिधी ) - नांदगाव येथील मविप्र समाज संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल मध्ये 'जागतिक महिला दिन' मोठ्या उत्साहात...
-
नांदगाव (प्रतिनिधी) - नांदगाव येथे गेल्या महिन्यात पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याने शहरातील आठ वर्षीय चिमुकला भावेश दिपक भ...
-
नांदगाव ( प्रतिनिधी ) - नांदगाव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूकीसाठी सोमवारी (दि.१७ ) शेवटच्या दिवशी नगराअध्यक्षपदासाठी ९ उमेदवार...
-
नांदगाव (प्रतिनिधी ) - उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र एच.एस.सी इयत्ता बारावी परीक्षा फेब्रुवारी / मार्च २०२५ मध्ये घेण्यात आल...
No comments:
Post a Comment