नांदगाव (प्रतिनिधी) - मनमाड येथील मयत मुलांच्या कुटुंबाला आर्थिक मदत लवकरात लवकर मिळावी व आरोपीला कठोर शिक्षा व्हावी यासाठी विविध मागण्यांचे आज दि. ५ डिसेंबर रोजी निवेदन नांदगाव नायब तहसीलदार यांना देण्यात आले. मनमाड येथे दि. १ डिसेंबर रोजी एक दुर्दैवी घटना घडली होती. मनमाड मधील एका अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक कृत्य करून त्या मुलाचा उजवा हात कापुन खून करण्यात आला होता. पोलिसांनी तात्काळ या घटनेची दखल घेत काही तासांच्या आत आरोपीला जेरबंद केले होते. खुन करणाऱ्या आरोपीचे नाव राहुल पवार याला कठोरात कठोर शिक्षा व्हावी व मयत मुलगा लोकेश सोनवणे यांच्या कुटुंबाला शासनामार्फत लवकरात लवकर आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी नांदगाव तहसीलदार यांना निवदेनाद्वारे करण्यात आली. या मागणीचे निवेदन देण्यासाठी आदिवासी आदिम सेना महिला आघाडी अध्यक्ष जयश्रीताई डोळे , आधार बौद्ध विकास संस्थेच्या एडवोकेट विद्या कसबे, शबाना मन्सुरी , पायल डोळे, योगिता सोनवणे व सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने करण्यात आली.
Subscribe to:
Post Comments (Atom)
नांदगाव येथील जे.टी. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूलचा सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेत घवघवीत यश!
नांदगाव (प्रतिनिधी ) - नांदगाव येथील जे. टि. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांचा CBSE केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंड...
-
नांदगाव (प्रतिनिधी) - नांदगाव येथे गेल्या महिन्यात पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याने शहरातील आठ वर्षीय चिमुकला भावेश दिपक भ...
-
नांदगाव ( प्रतिनिधी ) - नांदगाव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूकीसाठी सोमवारी (दि.१७ ) शेवटच्या दिवशी नगराअध्यक्षपदासाठी ९ उमेदवार...
-
नांदगाव ( प्रतिनिधी ) - नांदगावच्या लक्ष्मीनगर जवळील ढासे मळा येथील शाळा काही दिवसातच सुरू होत आहे . त्या निमित्ताने सामाजिक ...
No comments:
Post a Comment