Tuesday, December 20, 2022

नांदगाव शहरातील व्ही. जे. हायस्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभाची उत्साहात सांगता,



नांदगाव ( प्रतिनिधी ) - शाळा नियमित विविध उपक्रम राबवीत असते यातून विद्यार्थाचा सर्वांगीण विकास साधत असते.आपल्या मुलाने विविध क्षेत्रात प्रविण्य मिळवावे हीच सर्व पालकांची इच्छा असते.विद्यार्थांनी आपला अभ्यास करता करता ज्या क्षेत्रात आपल्याला करिअर करायचे आहे त्या क्षेत्राची माहिती घेऊन शालेय जीवनापासूनच त्यात प्राविण्य मिळविल्यास आपण जीवनात यशस्वी व्हाल असे प्रतिपादन विकास काकडे यांनी पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी आपल्या भावना व्यक्त केल्या . नांदगाव येथील व्ही.जे.हायस्कूल वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ उत्सहात संपन्न झाले. या शाळेत विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी शाळा स्नेह संमेलनानिमित्त कला,क्रीडा ,नाट्य ,तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.क्रीडा स्पर्धेत कबड्डी ,खो-खो सारखे विविध सांघिक ,वैयक्तिक व मनोरंजनात्मक खेळ घेण्यात आले .सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यानी विविध नृत्य प्रकार सादर केले . वर्षभरात विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या विविध स्पर्धा ,परीक्षा यामधील यशाचे कौतुक व प्रोत्साहान देण्यासाठी स्नेहसंमेलनाचा समारोप पारितोषिक वितरण समारंभाने झाला बक्षीसपात्र विद्यार्थांन प्रमुख पाहुण्याच्या हस्ते बक्षिस देऊन गौरविण्यात आले.पारितोषिक वितरणासाठी प्रमुख पाहुणे उद्योजक तथा ना.शि.प्र.मंडळ,नाशिक संस्थेचे सदस्य विकास काकडे व अध्यक्ष स्थानी शालेय समिती अध्यक्ष तथा संकुल प्रमुख संजीव धामणे होते.
  सुरवातीला लेझीम पथक व एन.सी.सी. पथकाच्या विद्यार्थांनी पाहुण्याचे स्वागत केले.त्यानंतर सरस्वती पूजन करून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली .कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक मनोहर बडगुजर यांनी केले. प्रास्ताविकात शाळेच्या विविध उपक्रमाची माहिती तसेच वर्षभरात घेण्यात येणाऱ्या स्पर्धा व परीक्षेत मिळविलेले यश याची माहिती दिली. अध्यक्षीय भाषणात संजीव धामणे यांनी शाळेतील विविध उपक्रमाचे कौतुक केले व आपल्या संस्कृती बरोबर आधुनिक युगाचा ध्यास धरणारी शाळा आहे अशी भावना व्यक्त केली कार्यक्रमाचे सूत्रसंचल प्रियंका पाटील यांनी केले पाहुण्याचा परिचय राजेश भामरे यांनी करून दिला व आभार उपमुख्याध्यापक दिपक बाकळे यांनी मानले. व शेवटी उत्कृष्ट ४ समूह नृत्याचे सादरीकरण करण्यात आले .
  या प्रसंगी शालेय समिती सदस्य मंदार रत्नपारखी ,मुख्याध्यापक मनोहर बडगुजर ,उपमुख्याध्यापक दिपक बाकळे ,पर्यवेक्षक मनोहर शिंदे ,अकॅडमीक बोर्ड सदस्य भैय्यासाहेब चव्हाण,भास्कर मधे,शिक्षक प्रतिनिधी सुनिता देवरे ,ज्ञानेश्वर डंबाळे तसेच पत्रकार ,तसेच शाळेचे माजी शिक्षक ,पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते .कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी यांनी परीश्रम घेतले.

No comments:

Post a Comment

नांदगावात निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसाचे शहराच्या विविध भागातून पथसंचलन,

नांदगाव (प्रतिनिधी  ) - दिंडोरी लोकसभा निवडणुकीचा प्रचार संपला असून, सोमवारी मतदान होणार आहे . या पार्श्वभूमीवर मतदान शांततेत पा...