नांदगाव (प्रतिनिधी ) - नांदगाव तालुक्यात १५ ग्रामपंचायत निवडणूकीचा निकाल नुकताच जाहीर झाला. यात नांदगाव तालुक्यातील १५ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत मतदारराजाने प्रस्थापितांना 'दे चक्का' दिला आहे. निकाल लागलेल्या १४ ग्रामपंचायतीमध्ये आमदार सुहास कांदेनी (शिंदे गट) वर्चस्व सिद्ध केले आहे.
महाविकास आघाडीतील घटकपक्ष बाजी मारतो की सत्ताधारी शिंदे गट आणि तसेच भाजप सर्वाधिक जागा जिंकते का याकडे तालुक्याचे लक्ष लागले होते. मंगळवारी निवडणुकीचा निकाल घोषित झाला. यामध्ये १५ पैकी १४ ग्रामपंचायतींवर सत्ताधारी शिंदे गटाच्या आमदार सुहास कांदे गटाचा झेंडा फडकला आहे.
पंधरा ग्रामपंचायतील नवसारी, शास्त्रीनगर, कसायखेडा या तीन ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे व काही ग्रामपंचायत सदस्य पदाचे उमेदवार अगोदरच बिनविरोध निवडले होते. बारा ग्रामपंचायतीचे निकाल मंगळवारी जाहीर झाले. बहुचर्चित मूळडोंगरी ग्रामपंचायतीत भाजप पदाधिकारी असलेल्या मिथुन पवार यांच्या मातोश्री मूळडोंगरी ग्रामपंचायतीमध्ये थेट सरपंचपदी निवडून आल्या आहेत.
परिवर्तन पॅनलचे सात उमेदवार निवडून आले आहे. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार संजय पवार यांचे बंधू राजेंद्र पवार हे भाजपचे पदाधिकारी असले तरी त्यांनी समर्थन शिंदे गटाला दिले आहे. तालुक्यात सर्वाधिक लक्ष लागुन राहिलेल्या नागापूर ग्रामपंचायतीमध्ये
थेट सरपंचपदाचे उमेदवार राजेंद्र पवारांनी पॅनलचे उमेदवार निवडून आणले तर माजी आमदार संजय पवार यांना फक्त एक जागेवर समाधान मानावे लागले आहे. लक्ष्मीनगर ग्रामपंचायतीमध्ये भाजप माजी तालुकाध्यक्ष बापूसाहेब जाधव यांच्या पॅनलचा पराभव केला. पिंपरखेड ग्रामपंचायतीमध्ये जीवन गरुड यांचे पॅनेलने सत्ता मिळवली आहे. तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल हा एकतर्फी लागला असून आमदार सुहास कांदे यांच्या नेतृत्वाखाली १४ ग्रामपंचायतीमध्ये शिंदे गाला सत्ता मिळविण्यात यश मिळाले आहे. थेट जनतेतून सरपंच पदावर निवडून आलेले राजेंद्र पवार नागापूर, मंजूषा गरुड पिंपरखेड, सुनीता चव्हाण कसावखेडा, शरद काळे पोटाणे खुर्द समर्थकांनी गुलाब उधळत जल्लोष केला.
भिका बिन्नर शास्त्रीनगर यांचेसह ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र देशमुख, सुधीर देशमुख, अनिल काळे यांचा सत्कार करण्यात आला. सर्व विजयी सरपंच व सदस्यांनी गुलाल उधळत जल्लोष केला.
विजयी सरपंच पदाचे उमेदवार असे (कंसात मते):-
सुनीता चव्हाण (बिनविरोध, कसाबखेडा), अशोक व्हगळ (बिनविरोध, नवसारी), भिका बिन्नर (बिनविरोध, शास्त्रीनगर), जनाबाई सुरेश पवार (८८७, मूळडोंगरी), राजेंद्र पवार (९०३, नागापूर), बिन्नर श्रावण (२८५, हिरेनगर), ज्योती निकम (६७३, लोढरे), अनिता मार्कड (३३४, भाडी), शीतल निकम (९०५ तळवाडे), मंजूषा गरुड (१३८०, पिंपरखेड), वचन शेरमाळे (४३५, बोयेगाव), मीराबाई उगले (१९३, लक्ष्मीनगर), शरद काळे (३८७ घोटाने, शांताराम पवार (६६२, हिसवळ), मनीषा वाघ (३५२, धनेर).
No comments:
Post a Comment