नांदगाव / मनमाड (प्रतिनिधी) - नाशिक विभागीय पदवीधर मतदार संघाची निवडणुक कार्यक्रम जाहीर झाला आहे. निवडणूक जाहीर झाल्याने विभागात आचारसंहिता लागू झालेली आहे अशी माहिती उपायुक्त उन्मेष महाजन यांनी दिली. पदवीधर निवडणुकांसाठी मतदान ३० जानेवारीला तर २ फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. नांदगाव तालुक्यातही मोठ्या प्रमाणात पात्र पदवीधर मतदार असुन त्यांना मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. मतदार संघात अनेक दिवसांपासून मतदार नोंदणी सुरू होती. पदवीधर झालेल्या मतदारांनी नोंदणी करण्यासाठी लागणारे कागदपत्र जोडून योग्य अर्ज भरला होता. त्यामुळे या सर्वांची नावे मतदार यादीत समाविष्ट करण्यात आली आहे.नाशिक विभागीय पदवीधर मतदार संघात विद्यमान आमदार डॉक्टर सुधीर तांबे हे आहेत. त्यांचा कार्यकाळ ७ फेब्रुवारीला संपणार आहे.
निवडणूक कार्यक्रम पुढीलप्रमाणे:-
अधिसूचना जारी करणे (५ जानेवारी २०२३) नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचा अंतिम दिनांक (१२ जानेवारी २०२३) नामनिर्देशन पत्राची छाननी (१३ जानेवारी २०२३) उमेदवारी मागे घेण्याचा अंतिम दिनांक (१६ जानेवारी २०२३) मतदानाचा दिवस (३० जानेवारी २०२३) मतदानाचा कालावधी (सकाळी ८ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत ) मतमोजणी दिनांक (२ फेब्रुवारी २०२३)
No comments:
Post a Comment