Friday, December 30, 2022

मांडवडच्या जनता विद्यालयात " वार्षिक स्नेहसंमेलन" उत्साहाने साजरा,




 मांडवड, नांदगाव (प्रतिनिधी)  - नांदगाव तालुक्यातील मराठा विद्या प्रसारक समाज संचलित स्व.शरद अण्णा आहेर जनता विद्यालय मांडवड शाळेत " वार्षिक स्नेहसंमेलन" उत्साहात साजरे करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मविप्र संस्थेचे सभासद  प्रशांत  आहेर हे होते.कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने व सरस्वती मातेच्या व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेच्या पूजनाने करण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून मुख्याध्यापिका कांबळे एस.एस.यांनी शाखा राबवत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली.त्याबरोबरच शाखेचा शैक्षणिक आलेख चढताच आहे असे अधोरेखित केले. प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले मविप्र संस्थेचे नांदगाव तालुका संचालक अमित  बोरसे(पाटील) यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी अशा प्रकारचे कार्यक्रमांची गरज असल्याचे नमूद केले. तसेच जर एखादा विद्यार्थी एखाद्या कला गुणांत सरस असेल तर अशा विद्यार्थ्यांचा संस्था विद्यार्थ्यांचा पुढील शैक्षणिक खर्च करत असल्याची माहिती ही अमित भाऊंनी दिली.खरी कला ही ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये दडलेली असते असे गौरव उद्गार विविध ग्रामीण भागातील कलाकारांचे दाखले देत अमित भाऊंनी आपल्या भाषणातून मांडले. व कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाप्रसंगी तालुक्याचे जेष्ठ नेते रमेश अण्णा बोरसे व रमेश फोडसे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.तसेच गावातून मविप्र संस्थेचे ज्येष्ठ सभासद रामराव मोहिते, वाल्मीक थेटे,  तसेच युवा उद्योजक सागर  आहेर,बापूसाहेब आहेर,  शिवबा ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष अशोक भाऊ निकम कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित होते.कार्यक्रमाप्रसंगी अमित  बोरसे(पाटील)मित्र मंडळ मांडवडचे मविप्र सभासद प्रशांत आहेर व युवा उद्योजक सागरभैय्या आहेर यांच्याकडून शाळेसाठी विद्यार्थीहित लक्षात घेऊन दहा फॅन देण्यात आले. सदर कार्यक्रम प्रसंगी विद्यार्थ्यांनी अनेक कलागुणांचे सादरीकरण केले.यामध्ये नृत्य,पोवाडा, कोळीगीते,नाटक,एकांकी अशा कार्यक्रमांत विद्यार्थ्यांनी स्वच्छतेविषयी,अंधश्रद्धे विषयी कार्यक्रमाच्या माध्यमातून संदेश दिला. सदर कार्यक्रमाला गावातून पालकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला.यामध्ये विद्यार्थ्यांनाही पालकांकडून त्यांच्या कलाविष्कारासाठी कौतुकाचे थाप दिली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयाच्या उपशिक्षिका श्रीमती बोरसे मॅडम, उपशिक्षक परदेशी एच.टी. संदीप आहेर सर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पी.डी. गोटे , बी.जी.  रायते , श्रीमती एम .के.अहिरे , जे.सी. सौंदाणे , कवडे मॅडम व सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन वडक्ते एस.के.यांनी केले. उत्साह पूर्ण वातावरणात कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला.

No comments:

Post a Comment

नांदगावच्या कासलीवाल प्राथमिक विद्यालयात वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात संपन्न ! विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबत खेळाकडे गांभीर्याने पाहण्याची काळाजी गरज,

नांदगाव (प्रतिनिधी ) -  शिक्षणाच्या जोडीला आरोग्य, शिस्त आणि आत्मविश्वासाचे संस्कार रुजविणाऱ्या क्रीडांगणावर, श्री....