Friday, January 20, 2023

नांदगाव तालुक्यातील गिरणानगर येथे राष्ट्रीय सेवा योजना +२ चे हिवाळी विशेष श्रमसंस्कार शिबिराचे उद्घाटन,

छायाचित्रकार - सुहास पुणतांबेकर 


नांदगाव (प्रतिनिधी) -    म. वि.  प्र. समाजाचे कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय नांदगावचे राष्ट्रीय सेवा योजना +२ चे हिवाळी विशेष श्रमसंस्कार शिबिराचा नांदगाव तालुक्यातील मौजे गिरणानगर   येथे गुरूवार दि. १९  रोजी उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. विश्वासराव दौलतराव कवडे (वरिष्ठ महाविद्यालयीन स्थानिक व्यवस्थापन समिती सदस्य) यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या प्रसंगी मविप्र संचालक अमित उमेदसिंग बोरसे,ज्येष्ठ नेते रमेश पुरुषोत्तम बोरसे,प्रसाद सोनवणे ,सर्जेराव आबा पाटील, विस्तार अधिकारी  विजयकुमार ढवळे, सरपंच श्रीमती अनिता पवार, उपसरपंच अनिल आहेर,सर्व ग्रामपंचायत सदस्य- कर्मचारीवर्ग व पंचक्रोशीतील नागरिक उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी आलेल्या सर्व मान्यवरांचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.एन. शिंदे यांच्या हस्ते गुलाब पुष्प व पुस्तक भेट देऊन सत्कार करण्यात आला. ग्रामपंचायत,गिरणानगर व ग्रा.प.कर्मचाऱ्याच्या वतीने मविप्र नांदगाव तालुका संचालक अमित बोरसे व इतर मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.एन.शिंदे यांनी प्रास्ताविकेतुन शिबिराचे महत्त्व व राष्ट्रीय सेवा योजना चळवळ ही विद्यार्थ्यांच्या श्रम संस्काराचे व्यक्तिमत्व विकासाचे जणू विद्यापीठच आहे असे मनोगत व्यक्त केले.श्रमसंस्कार शिबिरात येणारे अनुभव हे आपल्याला प्रेरणा देतात. आर.एल. दिवटे यांनी राष्ट्रीय सेवा योजनेचे उद्दिष्ट राष्ट्रीय सेवा योजना स्थापनेविषयीची माहिती सांगितली. युवा नेते प्रसाद  सोनवणे यांनी आपल्या मनोगतातून शिबिरार्थी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाचे अध्यक्ष अमितभाऊ बोरसे यांनी श्रमसंस्कार शिबिराच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी, राष्ट्रीय एकात्मता व आपला व्यक्तिमत्व विकास साधण्याचे आवाहन केले व सर्व शिबिरार्थी विद्यार्थ्यांचे सहभाग घेतल्याबद्दल विशेष कौतुक केले. उद्घाटन सोहळ्याचे आभार प्रदर्शन महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ एस.ए.मराठे यांनी केले व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या होत्या.सुत्रसंचालन बी.के.पवार यांनी केले.शिबिराच्या यशस्वितेसाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रमुख डी.आर.बच्छाव आर्.एल.दिवटे,डी.पी.दुसाणे,डी.एल.आहेर श्रीमती एस.ए. लोखंडे व महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक-कर्मचारीवृंद यांनी हिरीरीने सहभाग घेतला.

No comments:

Post a Comment

न्यू इंग्लिश विद्यालयात 'जागतिक महिला दिन' उत्साहात साजरा,

नांदगाव (प्रतिनिधी ) - नांदगाव येथील मविप्र समाज संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल  मध्ये 'जागतिक महिला दिन' मोठ्या उत्साहात...