छायाचित्रकार - सुहास पुणतांबेकर
नांदगाव( प्रतिनिधी) - महाराष्ट्र राज्य क्रीडा युवक सेवा संचालनालय पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी नंदुरबार आणि क्रीडा परिषद नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने विभागीय शालेय बॉक्सिंग स्पर्धा अंडर १९ वर्षे वयोगटाच्या दि. १३ जानेवारी रोजी क्रीडा संकुल नंदुरबार येथे संपन्न झाल्या होत्या. ह्या स्पर्धेसाठी नांदगाव ज्यूनियर कॉलेजच्या मुले व मुलींनी सहभाग नोंदविला होता. या स्पर्धेत मुले व मुलींनी सर्वोत्तम कामगिरी करून यश संपादन केले. या स्पर्धेत वैष्णवी चितळकर हीने सुवर्णपदक घेऊन प्रथम क्रमाकांने विजयी झालेली आहे. तिची पालघर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली. तर स्पर्धक माधुरी ठोंबरे हिचा विभागात व्दितीय क्रमांकाने विजयी झाली. सुनिता डोळे व्दितीय क्रमांकाने विजयी झाली. मुलांमध्ये ईश्वर पवार यांने व्दितीय क्रमांक पटकावला आहे.
सर्व स्पर्धकांना मराठा विद्या प्रसारक समाज चे नांदगाव संचालक इंजि. अमित बोरसे यांनी अभिनंदन केले. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.एन. शिंदे यांनी विजयी खेळाडूचा सत्कार केला. महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. मराठे सर व शिक्षक, शिक्षकेतर वर्गांनी यांनीही खेळाडूंचे अभिनंदन केले. खेळाडूंना योग्य व तांत्रिक कौशल्याचे मार्गदर्शन ज्यु. कॉलेजचे उपप्राचार्य डी.एम. राठोड, क्रीडा संचालक आर. डी. वडजे , दिलीप आहिरराव, ज्यु. कॉलेजचे उपप्राचार्य आर.टी. देवरे यांचं सहकार्य लाभले होते.
No comments:
Post a Comment