Friday, January 27, 2023

नांदगाव महाविद्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त 'लेखक तुमच्या भेटीला' कार्यक्रम संपन्न,




नांदगाव (प्रतिनिधी) - नांदगाव येथील मविप्र समाजाचे कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय नांदगाव येथे मराठी भाषा संवर्धन पंधरवडा- १४ जानेवारी ते २८ जानेवारी २०२३ अंतर्गत मराठी विभागाच्या वतीने विविध स्पर्धांचे व 'लेखक तुमच्या भेटीला' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी कवी, गीतकार मा. श्री. विष्णू थोरे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. महाराष्ट्रातील वेगवेगळ्या प्रदेशात आपली बोली आणि परिस्थिती सांभाळून कसे लेखन होत आहे याची जाणीव त्यांनी वेगवेगळ्या विषयांवरील कवितांद्वारे करून दिली. अलीकडच्या काळात मराठी भाषा संवर्धनाची आवश्यकता निर्माण झाली आहे, ही शोकांतिका देखील त्यांनी आपल्या वक्तव्यातून मांडली. त्याचसोबत महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा नांदगाव चे अध्यक्ष प्रा. सुरेश नारायणे यांनी त्यांच्या कविता सादर केल्या. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.एस.ए.मराठे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विभागप्रमुख प्रा.वाय.आर.वाघ यांनी केले. तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मराठी विभागाच्या प्रा.के.टी.बागुल व आभार प्रदर्शन डॉ.बी.बी.धोंगडे यांनी केले.


No comments:

Post a Comment

नांदगाव तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिन साजरा,

नांदगाव (प्रतिनिधी ) - मराठी पत्रकारीतेचे जनक आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमित्ताने दि.६ ...