नांदगाव ( प्रतिनिधी) - नांदगाव तालुक्यातील दोन कुटुंबियांच्या झोपडीस आग लागून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते त्या कुटुंबियांना आमदार सुहास अण्णा कांदे व सौ अंजुमताई कांदे यांच्या हस्ते गृह उपयोगी संसार भांडे कपडे अन्नधान्य भेट देण्यात आले.
नांदगाव तालुक्यातील पिंपरी हवेली येथील ऊसतोड कामगार विलास श्रावण सोनवणे, सौ. सखुबाई विलास सोनवणे, यांच्या झोपडीला आग लागून सर्व संसार खात झाला तसेच पळाशी येथील साहेबराव भावडू गायकवाड मोठ्या प्रमाणात संसाराची हानी झाली. दोन्ही कुटुंबांना आज आमदार निवास बोलावून त्यांना कपडे गॅस शेगडी संसार उपयोगी भांडे गहू तांदूळ देण्यात आले.
याप्रसंगी जिल्हाप्रमुख किरणभाऊ देवरे, प्रमोदभाऊ भाबड, विलासभाऊ आहेर, राहुल वाघ अनिल पवार, प्रकाश आव्हाड, रंगनाथ आव्हाड, सौ.रोहिणी मोरे, सौ.संगीता अनिल पवार, सौ. निराली राहुल वाघ, आदि उपस्थित होते.
No comments:
Post a Comment