छायाचित्रकार - सुहास पुणतांबेकर.
नांदगाव ( प्रतिनिधी) - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ , शारीरिक शिक्षण मंडळ पुणे अंतर्गत नाशिक जिल्हा विभागीय क्रीडा समिती व कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय नांदगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतर महाविद्यालयीन कॉर्फ बॉल मुले व मुली यांच्या स्पर्धा शनिवारी दि. ७ जानेवारी रोजी संपन्न झाल्या. या स्पर्धेत नाशिक विभागातील विविध महाविद्यालयातील संघाचा समावेश होता. नांदगाव महाविद्यालय च्या मुले - मुली संघाने सहभाग नोंदविला होता. नांदगाव च्या महाविद्यालयाने सर्वोत्तम कामगिरी करताना के. व्ही.एन नाईक महाविद्यालयाला अंतिम सामन्यात ५-० ने पराभूत प्रथम क्रमाकांने विजयी झाले आहेत. या स्पर्धेत निखिल औशिकर ( संघनायक), रवि खैरणार, कैलास डोळे, कार्तिक औशिकर, ऋषिकेश घोलप, गणेश औशिकर, बाजीराव कासार, आश्विनी औशिकर, कोमल बच्छाव, प्राची सौर, पुजा पंगुडवाले, स्नेहल इंगळे, प्रतिक्षा पेहरे, रोशनी औशिकर, इत्यादी विद्यार्थी सहभागी झाले होते. या सामान्यांसाठी पंच म्हणून डॉ. सुरेखा दप्तरे, डॉ. दिनेश उकिर्डे , संकेत कदम यांनी काम पाहिले.
स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी शिवछत्रपती पुरस्कार विजेते विष्णु निकम सर, नाशिक जिल्हा विभागीय क्रीडा समिती, नाशिक अध्यक्ष प्रमुख पाहुणे डॉ. पी.व्ही. रसाळ, स्पर्धेचे अध्यक्ष स्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.एन. शिंदे यांनी भुषविले होते. तसेच कनिष्ठ महाविद्यालयचे उपप्राचार्य आर.टी. देवरे यांनीही उपस्थिती दर्शविली होती. सर्व विजयी खेळाडू चे म.वि.प्र. नांदगावचे संचालक इंजि. अमित बोरसे यांनी अभिनंदन केले तर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.एन. शिंदे यांनी पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा देऊन त्यांचा सत्कार केला होता. महाविद्यालयाचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर वर्गांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. या खेळाडूंना योग्य, तांत्रिक कौशल्याचे मार्गदर्शन महाविद्यालयाचे क्रीडा संचालक राकेश वडजे, उपप्राचार्य दयाराम राठोड, दिलीप अहिरराव यांचे सहकार्य लाभले होते.
No comments:
Post a Comment