Tuesday, January 10, 2023

नाशिक जिल्हा मजूर संघाच्या अध्यक्षपदी प्रमोद भाबड,



  नांदगाव (प्रतिनिधी) -  नाशिक जिल्हा मजूर फेडरेशन अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक झाली. या वेळी झालेल्या चुरशीच्या लढाईत नांदगाव चे आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या नेतृत्वात आमदारांचे खंदे समर्थक प्रमोद भाबड यांची अध्यक्ष पदी निवड झाली.  
       जिल्हा मजूर संघाच्या संचालक पदासाठी गेल्या महिन्यात निवडणूक घेण्यात आली होती. यावेळी २० जागांपैकी ८ जागा बिनविरोध झाल्याने उर्वरित १२ जागांसाठी मतदान घेण्यात आले होते. काल मंगळवारी दि. १० जानेवारी रोजी पार पडलेल्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत मोठी चुरस होती. यात प्रमोद भाबड यांना १२ मते तर इगतपुरी चे ज्ञानेश्वर लहाने यांना ८ मते मिळाल्याने प्रमोद भाबड यांची बहुमताने अध्यक्ष पदी निवड झाली. तसेच संघाच्या उपअध्यक्ष पदी सौ. शर्मिला कुशारे यांची निवड झाली.   यावेळी आमदार सुहास आण्णा कांदे, जेष्ठ नेते बापूसाहेब कवडे, विष्णू निकम, नगराध्यक्ष राजेश कवडे, आनंद कासलीवाल, राजेंद्र पवार, योगेश पाटील, राजेंद्र भोसले, केदा आहेर, साईनाथ गिडगे, तेज कवडे, किशोर लहाने, किरण देवरे, मयुर बोरसे, अमोल नावंदर, डॉ. सांगळे, राजेंद्र देशमुख, संजय आहेर, अनिल रिंढे, दशरथ लहिरे, पंकज जाधव, जिल्हा मजूर संघाचे सर्व संचालक मंडळ तसेच उपस्थितांनी प्रमोद भाबड यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

No comments:

Post a Comment

नांदगावच्या कासलीवाल प्राथमिक विद्यालयात वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात संपन्न ! विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबत खेळाकडे गांभीर्याने पाहण्याची काळाजी गरज,

नांदगाव (प्रतिनिधी ) -  शिक्षणाच्या जोडीला आरोग्य, शिस्त आणि आत्मविश्वासाचे संस्कार रुजविणाऱ्या क्रीडांगणावर, श्री....