नांदगाव (प्रतिनिधी) - दि.२६ जानेवारी रोजी
नमन एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक संजय बागुल , संस्थापिका सौ.सरिता बागुल ,लिटील स्टार इंग्लिश मेडीयम स्कूल मुख्याध्यापिका अनुराधा खांडेकर आणि रेंनबो इंटरनॅशनल स्कूल मुख्याध्यापिका स्मिता सुर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली शाळेच्या प्रांगणात ७४ वा प्रजासत्ताक दिनाचा सोहळा मोठ्या जल्लोषात पार पडला.
आजच्या प्रजासत्ताक दिनाचे आकर्षण म्हणजे संस्थेने आपल्या परीसरातील शेतकरी बांधवांना बोलवून त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ७४. वा प्रजासत्ताक दिनी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांच्या शेतकरी पालकांना निमंत्रित करण्यात आले होते.आणि म्हणूनच आजचे ध्वजारोहण तालुक्यातील शेतकरी बांधवांच्या हस्ते पार पडले.बाळासाहेब बागुल (पोखरी),जगन्नाथ बोगीर (हिसवळ) शंकर शिंदे (दहेगांव),सर्जेराव पवार (साकोरे),सौ.सुमनबाई काशिनाथ सुरसे,राहुल काशिनाथ सुरसे (साकोरा),गणेश मोरे (मांडवड),.अंबादास जगधने सर (जगधने वाडा) योगेश बोगीर (हिसवळ),शिवाजी पाटील (क्रांतिनगर ,नांदगाव), प्रविण मोरे (साकोरे),रघुनाथ सांगळे (कासारी ,जळगांव) नरसिंग ठोके(साकुरी,मालेगाव)निलेश व सौ पुजा पाटील (बाणगाव),पुंजाराम सानप (वेहळगाव) रामेश्वर सदगिर ,(टाकळी),मधुकर राठोड (पिंप्राळे) रविंद्र व सौ.पल्लवी सोनवणे (हिसवळ),राजेंद्र सुर्यवंशी (मांडवड),भाऊसाहेब बागुल (दहेगांव),.पोपट डांगे (दहेगांव) संदिप फोडसे (टाकळी),शरद गोराडे (बाणगाव),मनोज म्हस्के (टाकळी), प्रशांत सुर्वे (चांदोरा)
सर्व शेतकरी बांधव तसेच महेश पेवाल ( पत्रकार) ,बाबासाहेब कदम ( पत्रकार) ,अनिल धामणे (पत्रकार) तसेच विठ्ठल राजाराम भाबड ,बबनराव साळी ,सूरज खैरनार (नांदगाव) आदि मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून लाभले होते.उपस्थित मान्यवर तसेच संस्थापक संजय बागुल व संस्थापिका सौ.सरिता बागुल लिटील स्टार इंग्लिश मीडियम स्कूल मुख्याध्यापिका श्रीमती अनुराधा खांडेकर रेंनबो इंटरनॅशनल स्कूल मुख्याध्यापिका श्रीमती स्मिता सुर्यवंशी यांच्याहस्ते सरस्वती पूजन ,ध्वजपूजन आणि मोठ्या उत्साहात ध्वजारोहण करण्यात आले.राष्ट्रध्वजाला सलामी देत राष्ट्रगीत आणि ध्वजगिताने लय धरला.यानंतर मार्च पास करण्यात आला.
संस्थापक बागुल सर व संस्थापिका सौ.बागुल यांच्याहस्ते उपस्थित सर्व मान्यवरांना प्रमाणपत्र व गुलाबपुष्प देऊन गौरविण्यात आले.नमन शिक्षण संस्थेचे संस्थापक बागुल सर व संस्थापिका सौ बागुल लिटील स्टार इंग्लिश मिडीयम स्कूल मुख्याध्यापिका श्रीमती अनुराधा खांडेकर रेंनबो इंटरनशनल स्कूल मुख्याध्यापिका श्रीमती स्मिता सुर्यवंशी यांचा गुलाबपुष्प देऊन सत्कार व स्वागत करण्यात आले. सर्व मान्यवरांच्या आसन व्यवस्थेनंतर शालेय प्रांगणात चिमुकल्यांचे नृत्याविष्कार सुरू झाले. एका मागोमाग एक धमाकेदार तसेच हृदय द्रावक नृत्याविष्कार उपस्थित वर्गाच्या डोळ्यात पाणी आणणारे होते.जणू चिमुकले या ठीकाणी शेतकरी राजाची करूण कहाणी मांडत होते.शेतकऱ्यांना होणारा त्रास आणि होणारे नुकसान तसेच बळीराजाची विवंचना यांचा लघुचित्रपट दाखवत होते.
नृत्यादरम्यान अनेक विद्यार्थ्यांनी आपले मनोगत अतिशय समर्पक शब्दांत मयानंतर उपस्थित पालकांनी शाळेबद्दल तसेच उपक्रमांबद्दल कौतुक करत अतिशय समर्पक शब्दांत आपले मनोगत व्यक्त केले.
उपस्थित सर्व मान्यवरांचे नमन शिक्षण संस्थेच्या वतीने आभार मानण्यात आले तसेच प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अतिशय सुरेख रित्या सहशिक्षिका.सौ.ज्योती सुरसे व सौ.वर्षा नगे यांनी केलेे. हा कार्यक्रम उत्कृष्ट रीत्या पार पाडण्यासाठी लिटील स्टार इंग्लिश मीडियम स्कूलच्या शिक्षिका अर्चना इंगोले अंकिता सरोदे भाग्यश्री शिंदे धनश्री न्याहारकर पूनम सोमासे विजेता पिलके सुरेखा गायकवाड नेहा पाटील ,संदीप पांडे ,राहुल उपाध्याय मोहन सुरसे अनिता जगधने, क्रिडा शिक्षक मयुरी क्षिरसागर तसेच रेंनबो इंटरनॅशनल स्कूलच्या शिक्षिका एडना फर्नांडिस मोनाली गायकवाड जयश्री चौधरी चैताली अहिरे रोहिणी पांडे अश्विनी केदारे ,दिव्या शिंदे तसेच मदतनीस श्रीमती अनिता नेमणार, वैशाली बागुल, छाया आवारे, ज्योती सोनवणे,मंजुषा जगधने,मंगेश शिंदे, विनोद चौधरी, गजानन पवार,सागर कदम ,बाळू गायकवाड,नासिर खान पठाण,चंदू बागुल ,रवि पटाईत यांनी अतोनात मेहनत घेऊन कार्यक्रम सुंदर रित्या पार पडला.
No comments:
Post a Comment