Wednesday, February 1, 2023

नांदगाव येथील जे. टी. कासलीवाल इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये क्रीडा महोत्सवास उत्साहात सुरुवात ,

नांदगाव ( प्रतिनिधी) -  आज  बुधवारी दि.१ फेब्रुवारी रोजी नांदगाव येथील जे. टी. कासलीवाल इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये क्रीडा महोत्सवास मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान एम.जे. कासलीवाल एज्युकेशन संस्थेचे चेअरमन मा. सुनीलकुमारजी कासलीवाल यांनी भूषविले. कार्यक्रमाचे अध्यक्ष तसेच संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे स्वागत स्कूलचे प्राचार्य मनी चावला यांनी गुलाबपुष्प देऊन केले .कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमापूजन व दीप प्रज्वलनाने तसेच वर्ग ६वी व ३रीच्या विद्यार्थ्यांनी गायलेल्या प्रार्थना गीताने झाली. यानंतर शालेय क्रीडा शिक्षक बागुल सर यांच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता आठवी व नववीच्या विद्यार्थ्यांनी रेड, ग्रीन, ब्ल्यू, यलो या हाऊस प्रमाणे संचलन केले. त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला. या कार्यक्रमांमध्ये विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सुंदर असे नृत्य सादर केले आणि कार्यक्रमाची शोभा वाढवली. कार्यक्रमाचे उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष यांनी लाल फीत कापून तसेच संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी शालेय ध्वज फडकवत श्रीफळ वाढवत, मशाल पेटवून केले. त्यानंतर संस्थेचे चेअरमन मा.सुनीलकुमारजी कासलीवाल यांनी सर्व विद्यार्थ्यांना क्रीडा खेळाची शपथ दिली.
या कार्यक्रमांमध्ये विविध खेळांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये कबड्डी खो-खो, रनिंग रेस, डॉजबॉल, लिंबू चमचा, पोते उडी याप्रमाणे अनेक खेळांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये विविध विद्यार्थी आपले कौशल्य दाखवीत मोठ्या प्रमाणात सहभागी होणार आहेत.
       या कार्यक्रमासाठी मनमाड शहराचे प्रसिद्ध उद्योजक श्री. सुदेश अरोरा तसेच संस्थेचे सेक्रेटरी विजय चोपडा, जुगलकिशोर अग्रवाल, महेंद्रभाऊ चांदिवाल तसेच सौ.क मा. कासलीवाल माध्यमिक व प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री डफळ सर ,सावंत सर शिक्षक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी ,विद्यार्थी, पालक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. शालिनी गोयल व सुदर्शन चोळके यांनी केले तर आभार शालेय क्रीडामंत्री अनुष्का सोनवणे यांनी मानले.

No comments:

Post a Comment

नांदगाव तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिन साजरा,

नांदगाव (प्रतिनिधी ) - मराठी पत्रकारीतेचे जनक आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमित्ताने दि.६ ...