बाबासाहेब कदम, पत्रकार
नांदगाव (प्रतिनिधी ) - नाशिक जिल्ह्यातील क्रियाशील पत्रकारांची एकमेव संघटना असलेल्या नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघ रजि.नाशिक चे सन्माननीय २०२२-२३ च्या जीवनगौरव व उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार संस्थापक-जिल्हाध्यक्ष यशवंत पवार व जिल्हाध्यक्ष आण्णासाहेब बोरगुडे यांनी जाहिर केले.ज्येष्ठ पत्रकार स्व.गंगाधर खुटाडे व ज्येष्ठ पत्रकार स्व.सुरेश अवधूत यांचे स्मरणार्थ दिला जाणारा जीवनगौरव पुरस्कार अनुक्रमे ओझरमिग येथील दै.'लोकमत'चे ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब वाघ व वाडीवर्हे येथील दिवंगत ज्येष्ठ पत्रकार स्व.अशोक शिंदे यांना मरणोत्तर प्रदान करण्यात येणार आहे.
नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघाच्यावतीने दरवर्षी पत्रकार दिनानिमित्त गत वर्षभरात जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडून तसेच विविध घडामोडिंचे उत्कृष्ट वृत्तांकन करुन त्यांना न्याय मिळवून देण्यात अग्रेसर असलेल्या पत्रकारांचा पुरस्काराने गौरव करण्यात येतो.त्याच बरोबर पत्रकारितेत ३० वर्षाहून अधिक योगदान देणारे व वयाची साठी ओलांडलेल्या [६० वर्ष ] ज्येष्ठ पत्रकारांना 'जीवनगौरव' पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.
उर्वरित पुरस्कारार्थींमधे बाबासाहेब कदम (सकाळ-नांदगाव), भास्कर भोये (देशदूत-सुरगाणा),सुनील घुमरे(पुण्यनगरी-जानोरी ता.दिंडोरी),संदीप पाटील (देशदूत-कळवण),राकेश आहेर (लोकमंथन-देवळा),हर्षल गांगुर्डे (सकाळ-चांदवड),योगेश अडसरे (लोकनामा-करंजी),विलास पगारे (गावकरी-येवला),अनिल गांगुर्डे (पुढारी-वणी),श्रीमती सोनाली गोरवाडकर (नगारा-मालेगाव),भिमा शिंदे (देशदूत-पाटोदा),चंद्रकांत जगदाळे (पुढारी-निफाड),समाधान तुपे (दिव्य मराठी-सिन्नर)मंगेश शिंदे(सकाळ ईगतपुरी),लियाकतखान पठाण (गावकरी-नाशिक ग्रा)राहुल बोरसे(सकाळ-त्र्यंबकेश्वर),राजेंद्र खुले(लोकनामा-नाशिक शहर),मायकल जाॅन खरात (प्रहार-नाशिक शहर),वैभव पवार (उत्कृष्ठ वृत्तवाहिनी प्रतिनिधी-खामखेडा) तर उत्कृष्ठ तालुका मराठी पत्रकार संघ पुरस्काराचे चांदवड तालुका मराठी पत्रकार संघाचा समावेश आहे.
लवकरच मान्यवरांच्या हस्ते पुरस्कारप्राप्त पत्रकारांना समारंभपूर्वक गौरविण्यात येणार असल्याची माहिती यशवंत पवार व आण्णासाहेब बोरगुडे यांनी दिली.
No comments:
Post a Comment