Tuesday, February 21, 2023

नांदगाव येथील श्री संत शिरोमणी सावता महाराज मंदिर सभा मंडपाचे आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या हस्ते भूमिपूजन,



     नांदगाव (प्रतिनिधी )  नांदगाव येथील श्री संत शिरोमणी सावता महाराज मंदिर परिसरासाठी आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या माध्यमातून साठ लाख रुपयांचा सभामंडप मंजूर करण्यात आला.आज मंगळवारी दि. २१ रोजी या सभा मंडपाचे भूमिपूजन आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या हस्ते करण्यात आले. 
   याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष पदी बापूसाहेब कवडे हे होते.मंचावर माजी नगराध्यक्ष बाळा काका कलंत्री, राजाभाऊ बनकर, बाली काका कवडे, राजाभाऊ मोरे ,विष्णू निकम, श्याम दुसाने, रमेश पगार, नांदगाव नगर पालिकेचे मुख्यअधिकारी विवेक धांडे ,राजाभाऊ मोरे ,अमृत पटेल, अनिल कळवा, राजाभाऊ देशमुख ,बाळासाहेब मोकळ, नगरसेवक वाल्मीक टिळेकर ,अमोल नावंदर, प्रकाश गायकवाड, पैठणकर तात्या, ईश्वर मोकळ, सादिक तांबोळी उपस्थित होते. 
    विष्णू निकम यांनी प्रस्तावना केली,
या मध्ये बोलताना त्यांनी आमदार सुहास आण्णा कांदे यांचे आभार मानले, अपेक्षिले त्याहून जास्त आपण आम्हाला दिले असा दानशूर आमदार आम्ही या आधी पहिला नाही, या आधी बलाढ्य आमदार होऊन गेले पण दान करण्याची वृत्ती ही फक्त आपण दाखवली या बद्दल सावता महाराज समिती तसेच उपस्थितां कडून त्यांनी आभार व्यक्त केले. सर्व जाती पंथाला सोबत घेऊन चालणारा आमदार लाभल्याचे भाग्य आहे असेही ते म्हणाले. 
    ज्येष्ठ नेते बापूसाहेब कवडे यांनी मनोगत व्यक्त करताना  आमदार सुहास आण्णा यांनी चौफेर आपले विकास कार्य सुरू ठेवले असून पाण्या सारखे पुण्याचे काम हाती घेऊन विविध योजना मार्गी लावल्या आता शेती सिंचनाला आपला मोर्चा वळवावा असे ते म्हणाले.
       आपल्या भाषणात बोलतांना आमदार सुहास आण्णा कांदे यांनी मी आमदार झालो त्याच दिवशी मी सर्व जाती धर्माचा, पक्षाचा, अगदी शेवटच्या स्थरावरच्या नागरिकाचा आमदार झालो आणि प्रत्येकाची सेवा करणे हे माझे कर्तव्य असल्याचे समजतो असे ते म्हणाले. मी आजपर्यंत मतदारसंघात अनेक विकास कामे करत असताना विविध पाणी योजना मार्गी लावल्या आता पुढचे लक्ष हे शेती सिंचनाला..असे करावे असल्याचे त्यांनी सांगितले. आपण मला कधीही हाक द्या मी आपल्यासाठी सदैव उपलब्ध राहील असा विश्वास त्यांनी बोलून दाखवला.
       सुरुवातीलाच आमदार सुहास आण्णा कांदे यांचे आगमन होताच फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली, ह. भ. प.गुरुकुल च्या विद्यार्थ्यांनी टाळ मृदुंगाच्या गजरात त्यांचे स्वागत केले . सूत्रसंचालन प्रशांत खैरनार यांनी केले तर बाळासाहेब मोकळं यांनी आभार मानले.  या प्रसंगी नांदगाव शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

नांदगाव तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिन साजरा,

नांदगाव (प्रतिनिधी ) - मराठी पत्रकारीतेचे जनक आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमित्ताने दि.६ ...