नांदगाव ( प्रतिनिधी) - नांदगाव मध्ये बुधवारी दि. १५ फेब्रुवारी रोजी 'नमन एज्युकेशन सोसायटी' संचलित लिटिल स्टार इंग्लिश मीडियम स्कूल नांदगाव आणि रेंनबो इंटरनॅशनल स्कूल नांदगाव यांची फॅन्सी ड्रेस स्पर्धा यशस्वीरित्या घेण्यात आली .
विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत नमन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष संजय बागुल, उपाध्यक्ष सरिता बागुल, लिटिल स्टार इंग्लिश मीडियम स्कूल मुख्याध्यापिका खांडेकर, रेंनबो इंटरनॅशनल स्कूल मुख्याध्यापिका स्मिता सुर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. फॅन्सी ड्रेस स्पर्धा विद्यार्थ्यांची कलागुणांना वाव देण्यास मदत करते त्याचबरोबर स्टेज डेरिंग वाढवते.
या स्पर्धेमध्ये विद्यार्थी वेगवेगळ्या वेशभूषा परिधान करून आले होते. विद्यार्थ्यांनी आपल्या वेशभूषेतून समाजाला विविध संदेश देण्याचे कार्य केले. या कार्यक्रमाचे पर्यवेक्षण नमन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष संजय बागुल , उपाध्यक्ष सरिता बागुल यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हे शाळेच्या शिक्षिका नगे व मोनाली यांनी केले. या स्पर्धेमध्ये एकूण १२५ मुलांनी सहभाग घेतला होता. त्यामध्ये विद्यार्थ्यांचे वयोगटा नुसार ग्रुप तयार करण्यात आले होते. या ग्रुपला अनुक्रमे ग्रुप ए,ग्रुप बी,ग्रुप सी,ग्रुप डी या प्रकारे नाव देण्यात आले होते. यामध्ये प्रत्येक सहभागी विद्यार्थ्यास सर्टिफिकेट वाटप करण्यात आले . प्रत्येक ग्रुप मधून प्रथम,द्वितीय तृतीय क्रमांक काढून विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले.
आज या वेगळ्या स्पर्धेचे आयोजन करत नमन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष संजय बागुल , उपाध्यक्ष सरिता बागुल यांनी विद्यार्थ्यांसाठी नवीन व्यासपीठ निर्माण करून दिले. ही स्पर्धा उत्तमरीत्या घडवून आणण्यासाठी सर्व शिक्षक,शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अतोनात मेहनत घेऊन ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडली.
No comments:
Post a Comment