नांदगाव (प्रतिनिधी) - नांदगाव येथील नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ संचालित व्ही.जे.हायस्कूल मान्यवरांच्या उपस्थितीत ' लोकशाही संवर्धन पंधरवडा ' या शासकीय उपक्रमांतर्गत शालेय विद्यार्थ्यांसाठी वकृत्व व रांगोळी स्पर्धा संपन्न झाल्या. विद्यार्थ्यांनी लोकशाही संवर्धन संदर्भित २५ आकर्षक रांगोळ्या काढल्या तसेच २० विद्यार्थ्यांनी वकृत्व स्पर्धेत सहभाग नोंदविला होता. या प्रसंगी गटशिक्षणाधिकारी प्रमोद चिंचोले , संकुल प्रमुख संजीव धामणे, मुख्याध्यापक मनोहर बडगुजर, उपमुख्याध्यापक दिपक बाकळे, पर्यवेक्षक मनोहर शिंदे बक्षिसपत्र विद्यार्थ्यांचे व सहभागी विद्यार्थांचे कौतुक केले. या स्पर्धा यशस्वीतेसाठी गुलाबराव मोरे, संगीता शिंदे, प्राजक्ता आहेर, चंद्रकांत दाभाडे, विजय चव्हाण, सुनीता देवरे, ज्ञानेश्वर डंबाळे, सुनीता कर्डिले, संध्या परदेशी यांनी परिश्रम घेतले.
Subscribe to:
Post Comments (Atom)
नांदगाव येथील जे.टी. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूलचा सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेत घवघवीत यश!
नांदगाव (प्रतिनिधी ) - नांदगाव येथील जे. टि. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांचा CBSE केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंड...
-
नांदगाव (प्रतिनिधी) - नांदगाव येथे गेल्या महिन्यात पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याने शहरातील आठ वर्षीय चिमुकला भावेश दिपक भ...
-
नांदगाव ( प्रतिनिधी ) - नांदगाव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूकीसाठी सोमवारी (दि.१७ ) शेवटच्या दिवशी नगराअध्यक्षपदासाठी ९ उमेदवार...
-
नांदगाव ( प्रतिनिधी ) - नांदगावच्या लक्ष्मीनगर जवळील ढासे मळा येथील शाळा काही दिवसातच सुरू होत आहे . त्या निमित्ताने सामाजिक ...
No comments:
Post a Comment