नांदगाव (प्रतिनिधी) - नांदगाव येथील नमन एज्युकेशन सोसायटी संचलित रेंनबो इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांची प्रश्नमंजुषा स्पर्धा बुधवारी दि.८ रोजी यशस्वीरित्या घेण्यात आली . विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत नमन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष संजय बागुल सर, उपाध्यक्ष सौ.सरिता बागुल ,रेंनबो इंटरनॅशनल स्कूल मुख्याध्यापिका स्मिता सुर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. प्रश्नमंजुषा स्पर्धा विद्यार्थ्यांची सॉफ्ट स्कील तयारी शिक्षकाकडून करून घेण्यात आली होती. या स्पर्धेत यशस्वी होण्यासाठी अभ्यास विद्यार्थ्यांनी करून घेतला होता .
या स्पर्धेमध्ये विविध राऊंडचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विद्यार्थ्यांचे चार ग्रुप तयार करण्यात आले होते पहिला ग्रुप ज्यूपिटर दुसरा ग्रुप सॅटर्न तिसरा ग्रुप व्हीनस आणि चौथा ग्रुप हा मर्क्युरी होता. त्यामध्ये व्यक्तींची ओळख, फरक ओळखा, विज्ञानाशी व अबॅकसशी निगडित प्रश्न इ. विद्यार्थ्यांच्या सामान्य ज्ञानात भर पडावी यासाठी जी. के. राऊंड आणि ओळखा पाहू मी कोण? हे राऊंड घेण्यात आले. विद्यार्थ्यांना ही प्रश्नमंजुषा गमतीदार वाटावी आणि या प्रश्नमंजुशे चा आनंद घेता यावा म्हणून फनते जे राऊंडचे आयोजन करण्यात आले होते. त्यात विद्यार्थ्यांनी कृती करून उत्तरे शोधायची होती चित्रे बघून कविता ओळखायची होती.
या वेगळ्या स्पर्धेचे आयोजन करत नमन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष संजय बागुल सर, उपाध्यक्ष सौ.सरिता बागुल मॅम ,रेंनबो इंटरनॅशनल स्कूल मुख्याध्यापिका स्मिता सुर्यवंशी यांनी मुलांना खूप छान व्यासपीठ उपलब्ध करून दिले.
ही स्पर्धा उत्तमरीत्या घडवून आणण्यासाठी लिटिल स्टार इंग्लिश मीडियम स्कूलचे शिक्षक पांडे सर तसेच रेनबो इंटरनॅशनल स्कूलच्या शिक्षिका एडना मॅम,जयश्री मॅम, मोनाली मॅम,अश्विनी मॅम यांनी अतोनात मेहनत घेऊन ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडली.
No comments:
Post a Comment