Wednesday, February 15, 2023

नांदगाव तालुक्यात संत श्री सेवालाल महाराज जयंती निमित्त अंजुमताई कांदे सहभागी,


नांदगाव ग्रामीण (प्रतिनिधी) -  संत श्री सेवालाल महाराज जयंती निमित्त आज बुधवारी दि. १५ फेब्रुवारी रोजी सौ.अंजुमताई कांदे यांनी विविध तांड्यांवर उपस्थित राहून संत श्री सेवालाल महाराज जयंती उत्सवात सहभाग घेतला.
  नांदगाव तालुक्यातील   वसंत नगर तांडा ,  ढेकू तांडा येथे मोठ्या उत्साहात जयंती साजरी करण्यात आली. ढेकू सेवागड तांडा येथील आई जगदंबा माता व संत सेवालाल महाराज मंदिर प्राणांगणात आयोजित श्री संत सेवालाल महाराज जयंती उत्सव प्रसंगी आवर्जून उपस्थित होत्या.
   याप्रसंगी बोलताना अंजुम ताईंनी बंजारा समाजातील मुलींना शिक्षणात प्रेरणा मिळावी म्हणून बारावी च्या परीक्षेत पहिल्या तीन मध्ये येणाऱ्या मुलींना भविष्यातील शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देणार असल्याचे जाहीर केले. बंजारा समाजाप्रती नेहमीच आमदार सुहास अण्णा कांदे व आम्हा सर्व कुटुंबीयांना प्रेम आहे आणि यापुढेही राहणार, तसेचआपल्या मुलींना जास्तीत जास्त शिक्षण द्या असेही आवाहन त्यांनी केले. 
बंजारा समाजातील तरुण मोठ्या संख्येने भारतीय सेनेत सेवा देत असून त्यातील काही जवान या ठिकाणी उपस्थित होते, या सर्वांचे ताईंच्या हस्ते स्वागत सत्कार करण्यात आला.कुमारी गायत्री सुनील चव्हाण या विद्यार्थिनीने उत्कृष्ट भाषण केले, ताईंनी तिचा सत्कार करत तिला ५०१₹ रुपयांचे बक्षीस या वेळी दिले.
    याप्रसंगी शिवसेना महिला आघाडीच्या तालुकाप्रमुख विद्याताई जगताप मनमाड शहर प्रमुख संगीता ताई बागुल नांदगाव शहर प्रमुख रोहिणी ताई मोरे, एन के राठोड, कांतीलाल चव्हाण, खूपचंद चव्हाण, भोपालाल राठोड गोरख चव्हाण, ढेकू ग्रामपंचायत सरपंच, उप सरपंच सदस्य आदींसह मोठ्या संख्येने बंजारा समाज बांधव मात्र भगिनी उपस्थित होत्या.

No comments:

Post a Comment

नांदगाव तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिन साजरा,

नांदगाव (प्रतिनिधी ) - मराठी पत्रकारीतेचे जनक आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमित्ताने दि.६ ...