नांदगाव ग्रामीण (प्रतिनिधी) - चाळीसगाव तालुक्यातील खडकी जवळील नव्या राष्ट्रीय महार्गावर काल दुपारी दोन दुचाकींच्यात झालेल्या भीषण अपघातात नांदगाव येथील दोघे ठार झाले.
यात ढेकू येथील जिल्हा परिषदेचे शिक्षक व परधाडी येथील सेवानिवृत्त लष्करी जवानाचा समावेश आहे. या घटनेमुळे नांदगाव व परधाडी येथे हळहळ व्यक्त होत आहे. दुपारी चार वाजेच्या सुमाराला नांदगावहून चाळीसगावकडे दुचाकीने जाणाऱ्या व समोरून येणाऱ्या दुचाकीशी जबरदस्त धडक झाली.
त्यात दोघाही दुचाकीचे अतोनात नुकसान झाले व दुचाकीस्वारांचा जागेवरच मृत्यू झाला. चाळीसगाव पोलिसात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. तालुक्यात ढेकू खुर्द येथील प्राथमिक शाळेत शिक्षक असलेले योगेश आनंदा जाधव (वय -४६) हे आपले मित्र विजय सोळसे यांच्यासह नांदगाव येथील आपल्या घरून दुपारी चाळीसगावला नव्या दुचाकीने निघाले होते.
या घटनेमुळे नांदगाव व परधाडी येथे हळहळ व्यक्त होत आहे. दुपारी चार वाजेच्या सुमाराला नांदगावहून चाळीसगावकडे दुचाकीने जाणाऱ्या व समोरून येणाऱ्या दुचाकीशी जबरदस्त धडक झाली. त्यात दोघाही दुचाकीचे अतोनात नुकसान झाले व दुचाकीस्वारांचा जागेवरच मृत्यू झाला. चाळीसगाव पोलिसात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. तालुक्यात ढेकू खुर्द येथील प्राथमिक शाळेत शिक्षक असलेले योगेश आनंदा जाधव (वय- ४६) हे आपले मित्र विजय सोळसे यांच्यासह नांदगाव येथील आपल्या घरून दुपारी चाळीसगावला नव्या दुचाकीने निघाले होते.
No comments:
Post a Comment