नांदगाव, गंगाधरी( प्रतिनिधी) - नांदगाव तालुक्यातील गंगाधरी ग्रामपंचायत चे राष्ट्रवादीचे सरपंच सुनील गणेश खैरनार उप सरपंच वर्षा गणेश ईघे , गणेश शिवाजी ईघे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस ला सोडचिठ्ठी देत आज आमदार निवास स्थानी शिवसेना पक्षात प्रवेश केला.
आमदार सुहास आण्णा कांदे शिवबंधन बांधत भगवी शाल , पुष्पगुच्छ देऊन यांचे पक्षात स्वागत केले. आपल्याला येथे मान सन्मान मिळेल, आपल्या सूचना ऐकून घेतल्या जातील तसेच विकासाकरिता सदैव आपल्या सोबत राहू अशी ग्वाही या वेळी आमदार सुहास आण्णा कांदे यांनी दिली.
या वेळी जिल्हा प्रमुख किरण देवरे, गंगाधरी चे शिवसेना शाखा प्रमुख दिगंबर भागवत, रमेश गांगुर्डे, राजाभाऊ देशमुख, संजय आहेर, रामहरी ईघे, भगीरथ जेजुरकर, सोपान जाधव, नाना ईघें, साहेबराव मोकळं, संदीप खैरनार, अनिल बागुल, भरत ईघें उपस्थित होते.
No comments:
Post a Comment