नादगाव( प्रतिनिधी) - नांदगाव शहरातील श्री नंदेश्वर महादेव मंदिरात ओम नम: शिवाय,हरहर महादेव,बम बम भोलेंच्या गजरात महाशिवरात्री निमित्ताने भाविकांनी पहाटे पासूनच मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. भक्तीमय वातावरण महापुजा करण्यात आली.
महाशिवरात्री निमित्ताने शहरातून दुपारी नांदेश्वर महादेव पालखी मिरवणूक काढण्यात आली. या पालखी सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे कलर्स मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका जय शंकर मधील बाल शंकराचे पात्र साकारणारा बाल कलाकार आरूष बेडेकर होता. माधवनाथ महाराजांच्या पालखी मागे रथावर बसून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. पालखी मिरवणूक प्रमुख मार्गाने काढून पालखीचा समारोप नांदेश्वर महादेव मंदिर येथे करण्यात आला.
पालखी समवेत मोठ्या संख्येने महिला व पुरुष, लहान मुले सहभागी झाले होते. महाशिवरात्री निमित्त शहरातील विविध ठिकाणच्या महादेव मंदिरात महाशिवरात्री मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
No comments:
Post a Comment