नांदगाव ( प्रतिनिधी ) - सुरक्षित व सुदृढ आरोग्यासाठी आपल्या आहारातून सर्व प्रकारचे जीवनसत्व मिळणे शरीराला गरजेचे असते .म्हणून आपल्या आरोग्यासाठी संतुलित आहाराची गरज आहे असे प्रतिपादन नांदगाव ग्रामीण रुग्णालय च्या अधिक्षक डॉ.ख्याती तुसे यांनी व्ही.जे.हायस्कूल येथे ‘’ जागरूक पालक ,सुदृढ बालक’’ अभियानाच्या उद्घाटन प्रसंगी विद्यार्थांना मार्गदर्शन पर भाषणात सांगितले.महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने राज्यभर ‘’ जागरूक पालक ,सुदृढ बालक’’ अभियानाला सुरवात करण्यात आली .या अभियानाचे उद्घाटन राज्यभर ठिकठिकाणी करण्यात आले नांदगाव तालुक्यात उद्घाटन व्ही.जे.हायस्कूल येथे नुकतेच संपन्न झाले या उद्घाटन प्रसंगी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.संतोष जगताप,गटशिक्षणाधिकारी प्रमोद चिंचोले , शालेय समिती अध्यक्ष संजीव धामणे ,मुख्याध्यापक मनोहर बडगुजर,उपमुख्याध्यापक दिपक बाकळे,पर्यवेक्षक मनोहर शिंदे,आर.बी.एस.के.च्या आरोग्य टीमचे सर्व डॉक्टर व नर्स उपस्थित होते. या प्रसंगी डॉ.ख्याती तुसे यांनी माहिती दिली व तालुका आरोग्य अधिकारी डॉ.संतोष जगताप यांनी या अभियाना अंतर्गत 0 ते १८ वयोगटातील मुला-मुलींची आरोग्य तपासणी करणे,आजारी आढळलेल्या बालकांवर त्वरित उपचार करणे,गरजू आजारी बालकांना संदर्भ सेवा पुरविणे प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा पुरविणे ,सुरक्षित व सुदृढ आरोग्यासाठी समुपदेशन करणे असे उपक्रम या अंतर्गत राबविले जाणार आहे याची माहिती देऊन विद्यार्थांचे समुपदेशन केले.प्रमोद चिंचोले यांनी आरोग्य चांगले असेल तर अभ्यासातही आपण चांगली प्रगती करू शेकतो तसेच आपण विविध क्षेत्रात पुढे प्रगती कराल असे सांगितले तर संजीव धामणे यांनी आमच्या शाळेतील विद्यार्थांना आरोग्याच्या काही समस्या असतील तर आमच्या विद्यार्थांना योग्य पद्धतीने आरोग्य विभागाने सहकार्य करावे असे सांगितले.
यानंतर महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग आयोजित झूममिटिंग व्दारे मुख्यमंत्री ,आरोग्य मंत्री , आरोग्य संचालक यांनी ऑनलाईन पद्धतीने उद्घाटन करून राज्यभरातून विद्यार्थी व पालकांना यांना सहभागी करून घेतले व मार्गदर्शन केले.या ऑनलाईन उद्घाटनाला नांदगाव तालुक्यातून व्ही.जे.हायस्कूल शाळेतील विद्यार्थी ,शिक्षक,शालेय पदाधिकारी व आरोग्य विभा गातातील पदाधिकारी झूममिटिंग व्दारे सहभागी झाले.या अभियानच्या शाळेतील उद्घाटन प्रसंगी उपस्थित मान्यवरांचे स्वागत व विद्यार्थांनी गुलाबपुष्प देऊन केले.आभार शाळेचे मुख्याध्यापक मनोहर बडगुजर यांनी आभार मानले व सूत्रसंचालन प्रियंका पाटील यांनी केले. तर ऑनलाईन व्यवस्था अनिल तांबेकर यांनी केली.कार्यक्रम यशस्वितेसाठी आरोग्य विभागाचे कर्मचारी व शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मेहनत घेतली.
No comments:
Post a Comment