नांदगाव ( प्रतिनिधी) - नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ संचलित व्ही. जे.हायस्कुलचा विद्यार्थी सार्थक देवरे यांनी रीड टू मी या स्पर्धेत जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे. महाराष्ट्र शासन आणि इंग्लिश हेल्पर या सामाजिक संस्थेच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांचे इंग्रजी वाचन आणि आकलन कौशल्य सुधारण्यासाठी राज्यात शासनाच्या शाळांमध्ये ' रीडटूमी' या अँपचा वापर केला जातो. उपक्रमाअंतर्गत इयत्ता ६वी ते ९ वीच्या विद्यार्थ्यांसाठी जिल्हास्तरीय स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये ' रीडटूमी ' चा वापर करून, वर्गात शिकवलेल्या इंग्रजी पाठाची उजळणी विद्यार्थी कशाप्रकारे करतात यावर एक सारांशरूपी व्हिडीओ बनवायचा होता. नाशिक जिल्ह्यातील अनेक शाळांमधून विद्यार्थांनी या स्पर्धेत भाग घेतला होता.
या स्पर्धेमध्ये व्ही.जे.हायस्कुल,नांदगाव शाळेतील इयत्ता इयत्ता सातवी चा विद्यार्थी सार्थक श्रीकांत देवरे या विद्यार्थ्याला जिल्ह्यात प्रथम पारितोषिक मिळाले.त्याबद्दल त्याला गोल्ड मिडल व प्रमाणपत्र शाळेचे मुख्याध्यापक मनोहर बडगुजर व पर्यवेक्षक मनोहर शिंदे यांच्या हस्ते देऊन गौरव करण्यात आला या प्रसंगी रीड टू मी चे प्रतिनिधी विशाल गलाटे, पंचायत समिती शिक्षण विभागाचे योगेश फटांगरे त्या विद्यार्थांचे वडील डॉ.श्रीकांत देवरे उपस्थित होते.या विद्यार्थाला अनिल तांबेकर यांनी मार्गदर्शन केले.या विद्यार्थांनी मिळविलेल्या यशाबद्दल संकुल प्रमुख संजीव धामणे, उपमुख्याध्यापक दिपक बाकळे व शाळेतील सर्व शिक्षक ,विद्यार्थी यांनी त्याचे कौतुक केले .
No comments:
Post a Comment