नांदगाव (प्रतिनिधी) - नांदगाव नगरपरिषद येथे “ केंद्र शासन पुरस्कृत” प्रधानमंत्री आत्मनिर्भर निधी (पीएम स्वनिधि ) योजनेअंतर्गत नांदगाव शहरातील लाभ घेतलेल्या पथविक्रेत्यांना डिजिटल ऑन बोर्ड चे प्रशासक तथा मुख्याधिकारी विवेक धांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत वाटप करण्यात आले. यावेळी प्रशासकीय अधिकारी मुक्ता कांदे, सहायक प्रकल्प अधिकारी आनंद महिरेे , राहुल कुटे (कर निरीक्षक) इ. उपस्थित होते. नादगाव शहरात ३८१ पथविक्रेत्यांची नोंदणी झालेली असून, आतापर्यंत २१० पथविक्रेत्यांना रुपये १००००/- चे पहिल्या टप्प्याचे तर ८४ पथविक्रेत्यांना रुपये २००००/ चे दुस-या टप्प्याचे आणि १७ पथविक्रेत्यांना रुपये ५००००/- चे तिस-या टप्प्याचे कर्ज शहरातील बँकांमार्फत वितरीत करण्यात आले आहे. “मै भी डिजिटल ४.०” या मोहिमे अंतर्गत “ केंद्र शासन पुरस्कृत” प्रधानमंत्री आत्मनिर्भर निधी (पीएम स्वनिधि ) योजनेअंतर्गत नांदगाव शहरातील लाभ घेतलेल्या पथविक्रेत्यांना “मै भी डिजिटल ४.०” या मोहिमेचा लाभ घेण्याचे आवाहन नांदगाव नगरपालिकेकडून करण्यात आले आहे. पथविक्रेत्यांना खेळते भांडवल मिळावे या दृष्टिकोनातून सुरू करण्यात आलेली केंद्र शासनाची प्रधानमंत्री आत्मनिर्भर निधी योजना सध्या राज्यात राबविली जात आहे. या योजनेचा महत्त्वाचा भाग म्हणजे पथविक्रेत्यांचे औपचारिक अर्थव्यवस्थेत समावेशन करणे होय . लाभार्थी पथविक्रेता यांनी आर्थिक व्यवहार करताना डिजिटल साधनांचा वापर केल्यावर पथविक्रेत्यांना कर्जाच्या रकमेव्यतिरिक्त कॅशबॅक प्राप्त होणार आहे. या कामी पीएम स्वनिधि योजनेचा लाभ मिळालेल्या पथविक्रेत्यांनी डिजिटल पेमेंट साधनांचा वापर करावा याबाबत शासनामार्फत निर्णय घेण्यात आलेला आहे. नांदगाव शहरात दिनांक ७ फेब्रुवारी ते १६ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत “मै भी डिजिटल ४.०” नावाची मोहीम राबविण्यात येत आहे . त्यानुसार पीएम स्वनिधि योजने अंतर्गत कर्जाचा लाभ घेतलेल्या परंतु अद्याप पावतो डिजिटल पेमेंट साधनांचा वापर न केलेल्या पथविक्रेत्यांनी नांदगाव नगरपालिकेच्या एनयुएलएम कक्ष येथे संपर्क साधून डिजिटल ऑन बोर्डिंग प्रशिक्षण घेऊन त्वरित त्यांना मिळालेल्या कर्जाच्या रकमेव्यतिरिक्त डिजिटल ऑन बोर्डिंग द्वारे मिळणाऱ्या कॅश बँक याचा लाभ घेता येणार आहे. जास्तीत जास्त पथविक्रेत्यांनी या योजनेचा लाभ घेण्याचे जाहीर आवाहन प्रशासक तथा मुख्याधिकारी विवेक धांडे यांनी केले आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
नांदगाव तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिन साजरा,
नांदगाव (प्रतिनिधी ) - मराठी पत्रकारीतेचे जनक आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमित्ताने दि.६ ...
-
नांदगाव ( प्रतिनिधी ) - नांदगाव तालुका हा शांतताप्रिय तालुका म्हणून ओळखला जातो. या तालुक्यात जातीवा...
-
नांदगाव ( प्रतिनिधी ) - एकमेकांच्या सुखदुःखात कुटुंबंांची एकी कशी असावी याचे उत्तम उदाहरण म्हणजे नांदगाव शहरातील गुप्ता कुटुंबं...
-
नांदगाव (प्रतिनिधी ) - ए.एच.सी अकादमी मालेगाव तर्फे दि. २१ जानेवारी रोजी ए.एच.सी टॅलेंट हंट परीक्षेचं आयोजन करण्यात आले होते. या...
No comments:
Post a Comment