नांदगाव ( प्रतिनिधी) - नमन एज्युकेशन संचलित "लिटील स्टार इंग्लिश मेडीयम स्कूल"आणि रेंनबो इंटरनॅशनल स्कूल नांदगाव या दोन्ही शाळांच्या संयुक्त विद्यमाने शालेय विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. शुक्रवार दि.०३ फेब्रुवारी रोजी नमन एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक संजय बागुल संस्थापिका सरिता बागुल लिटील स्टार इंग्लिश मेडीयम स्कूल मुख्याध्यापिका अनुराधा खांडेकर आणि रेंनबो इंटरनॅशनल स्कूल मुख्याध्यापिका स्मिता सुर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली शालेय प्रांगणात शालेय विज्ञान प्रर्दशन आयोजित करण्यात आले होते.
आजच्या या विज्ञान प्रदर्शनाला प्रमुख अतिथी म्हणून सुप्रभा सुर्यवंशी शेळके .पाटील तसेच शालेय संस्थापक संजय बागुल व संस्थापिका सरिता बागुल लिटील स्टार इंग्लिश मीडियम स्कूल मुख्याध्यापिका अनुराधा खांडेकर रेंनबो इंटरनॅशनल स्कूल मुख्याध्यापिका स्मिता सुर्यवंशी यांच्याहस्ते या विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.त्यानंतर उपस्थित पाहुण्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले.
हे प्रदर्शन शालेय प्रांगणात मोठ्या उत्साहात भरविण्यात आले होते.शालेय प्रांगणात मंडप टाकून मुलांचे विविध मॉडेल् ,विविध प्रयोग व्यवस्थित रित्या मांडण्यात आले होते.मुलां- मुलींनी अतिशय सुंदर पणे आपआपल्या प्रयोगांचे सादरीकरण केले.शाळेतील सर्व मुलांना विज्ञान प्रदर्शन दाखविण्यात आले. त्यानंतर सर्व सहभागी विद्यार्थ्यांना सन्माननीय प्रमुख अतिथी तसेच सन्माननीय संचालक संजय बागुल संचालिका सरिता बागुल यांच्याहस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.अशा रितीने अतिशय आल्हाददायक वातावरणात कार्यक्रम संपन्न झाला.
कार्यक्रमाचे सुरेख असे सुत्रसंचलन शालेय शिक्षिका जयश्री चौधरी यांनी केले व सर्वांचे आभार मानले.
सर्व विद्यार्थ्यांनी स्पर्धेस भरभरुन प्रतिसाद दिला.
हा कार्यक्रम उत्कृष्ट रीत्या पार पाडण्यासाठी लिटील स्टार इंग्लिश मीडियम स्कूलच्या शिक्षिका अर्चना इंगोले अंकिता सरोदे भाग्यश्री शिंदे धनश्री न्याहारकर पूनम सोमासे विजेता पिलके सुरेखा गायकवाड नेहा पाटील ज्योती सुरसे वर्षा नगे संदीप पांडे राहुल उपाध्याय मोहन सुरसे अनिता जगधने क्रिडा शिक्षक मयुरी क्षिरसागर तसेच रेंनबो इंटरनॅशनल स्कूलच्या शिक्षिका एडना फर्नांडिस मोनाली गायकवाड जयश्री चौधरी चैताली अहिरे रोहिणी पांडे अश्विनी केदारे ,दिव्या शिंदे तसेच मदतनीस अनिता नेमणार, वैशाली बागुल, ज्योती सोनवणे,मंजुषा जगधने,मंगेश शिंदे, विनोद चौधरी, गजानन पवार,सागर कदम ,बाळू गायकवाड,नासिर खान पठाण,चंदू बागुल ,रवि पटाईत यांनी अतोनात मेहनत घेऊन कार्यक्रम सुंदर रित्या पार पडला.
No comments:
Post a Comment