Tuesday, February 28, 2023

जे. टी. कासलीवाल इंग्लिश मिडियम स्कूल मध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन सोहळा, विद्यार्थ्यांनी सादर केले विविध विज्ञानाचे प्रयोग प्रदर्शन,




 नांदगाव( प्रतिनिधी) -  विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाबद्दल कुतूहल निर्माण करण्यासाठी तसेच त्यांच्यातील वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवण्यासाठी नांदगाव शहरातील जे.टी. कासलीवाल इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात आला. या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून खुशबू खेमणार व भावना आबड (विद्यार्थी पालक) म्हणून उपस्थित होत्या. यांच्या हातून विज्ञान प्रदर्शन हाॅलची रिबीन कट करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. विज्ञान शिक्षिका  मोहिनी देसले यांनी विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस लागावा यासाठी मार्गदर्शन केले . तसेच विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त वेगवेगळ्या संशोधकांविषयी माहिती दिली.या दिवशी विज्ञान प्रयोगाचे प्रदर्शन ,चित्रकला स्पर्धा, वैज्ञानिक प्रात्यक्षिके ,प्रश्नमंजुषा यांसारखे बरेच उपक्रम आयोजित करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यावेळी विद्यार्थ्यांचा उत्साह अवर्णनीय होता. विद्यार्थ्यांचे प्रयोग प्रात्यक्षिके बघण्यासाठी पालकही उपस्थित होते.
विद्यालयातील प्राचार्य  मणी चावला सर, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी पालक यांनी मिळून यशस्वी रित्या राष्ट्रीय विज्ञान दिन सोहळा पार पाडला . सर्व विद्यार्थ्यांना संस्थेचे चेअरमन  सुनिलकुमार कासलीवाल , संस्थेचे सचिव विजय चोपडा, सरचिटणीस प्रमिलाताई कासलीवाल, जुगलकिशोर अग्रवाल, रिखबचंद कासलीवाल, महेंद्र चांदिवाल, प्रशासकीय प्रमुख प्रकाश गुप्ता यांनी राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.

No comments:

Post a Comment

क.भा.पा. विद्यालयातील एम.पी.सोनवणे सरांना WHC संघटनेतर्फे राष्ट्रीय शिक्षकरत्न पुरस्कार,

नांदगाव ग्रामीण (प्रतिनिधी ) -  कर्मवीर भाऊराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय ,साकोरे येथे गुरुवारी दि.  १९ सप्टेंबर र...