Wednesday, March 29, 2023

नांदगाव येथे जागतिक शून्य कचरा दिन साजरा, शहरातील विविध भागात स्वच्छता मशाल जनजागृती,



नांदगांव (प्रतिनिधी) -  नगर परिषदेच्या वतीने बुधवारी  दि. २९ मार्च रोजी स्वच्छ सर्वेक्षण २०२३, माझी वसुंधरा ३.० आणि DAY-NULM यांच्या संयुक्त विद्यमानाने मुख्याधिकारी तथा प्रशासक विवेक  धांडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वछोत्सव २०२३ व जागतिक शून्य कचरा दिन* साजरा करण्यात आला. यात नांदगाव शहरातील नागरिकांना कचरा वर्गीकरण, स्वच्छतागृहाची स्वच्छता, हँडवॉश, तसेच दैनंदिन निर्माण होणारा कचरा ओला व सुका कचरा, सॅनिटरी व घरगुती घातक कचऱ्याचे प्रकार , वेस्ट टू वेल्थ, होम कंपोस्ट, प्लास्टिक बंदी व कापडी पिशवीचा वापर याबाबत सविस्तर माहिती देऊन शहर स्वच्छतेबाबत प्रशिक्षण देण्यात आले. त्याचप्रमाणे शहरातील विविध भागात 
स्वच्छता मशाल जनजागृती फेरीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित महिला बचत गटातील महिलांना व नागरिकांना स्वच्छतेची शपथ देण्यात आली. सदर कार्यक्रम प्रसंगी स्त्री शक्ती स्तर संघ, एकविरा वस्ती सर संघ, नांदेश्वरी वस्ती स्तर संघ, नीलंबरी वस्ती स्तर संघ, वैष्णवी वस्ती स्तर संघ, ज्ञानज्योती, निर्मिती,व सारनाथ या वस्ती स्तर संघातील बचत गटातील महिलांनी मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.राहुल कुटे, (प्र. स्वच्छता निरीक्षक), गौरव चुंबळे (सिटी कॉर्डिनेटर) ,आनंद महिरे (सहा. प्रकल्प अधिकारी),  विजया धनवट (समूदाय संघटक),  बिजला गंगावणे (क्षेत्रीय समन्वयक) यांनी मार्गदर्शन केले. तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी राजश्री बेलदार, संगीता सोनवणे, अलका गायकवाड, रत्ना वाबळे, अलका पांडे, योगिता काळीज या स्वच्छता दूतानी विशेष परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment

नांदगावच्या कासलीवाल प्राथमिक विद्यालयात वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात संपन्न ! विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबत खेळाकडे गांभीर्याने पाहण्याची काळाजी गरज,

नांदगाव (प्रतिनिधी ) -  शिक्षणाच्या जोडीला आरोग्य, शिस्त आणि आत्मविश्वासाचे संस्कार रुजविणाऱ्या क्रीडांगणावर, श्री....