Monday, April 3, 2023

नांदगाव बाजार समिती पंचवार्षिक निवडणुकीसाठी करिता १४९ अर्ज दाखल



नांदगाव( प्रतिनिधी) -  तालुक्यात नांदगाव व मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीने राजकारण तापले आहे. नांदगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी १४९ उमेदवारांनी सोमवारी आपले अर्ज दाखल केले. या वेळी उमेदवारांसोबत अर्ज सादर करताना आमदार सुहास कांदे, ज्येष्ठ नेते बापूसाहेब कवडे, माजी आमदार पंकज भुजबळ, अॅड. अनिल आहेर यांनी हजेरी लावली. यंदा बाजार समितीच्या संचालक मंडळाची निवडणूक सरळ लढतीची असल्याने कुठल्या पॅनेलमधून कुणाला उमेदवारी बहाल होईल याची नेमकी खात्री मिळत नसल्याने अनेक इच्छुकांनी आपल्यासाठी लॉबिंग सुरु केल्याचे यानिमित्ताने दिसून आले.
    त्यासाठी निवडणूक कार्यलयात आमदार सुहास कांदे ज्येष्ठ नेते बापूसाहेब कवडे माजी आमदार पंकज भुजबळ माजी आमदार अँड अनिल आहेर हे उपस्थितीत होते.  केवळ अर्ज भरून असा निरोप असल्याने कागदपत्रांची जुळवाजुळव करीत वेळ टळणार नाही याची काळजी घेत इच्छुकांची लगबग सुरु होती. नांदगाव बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या अठरा जागेसाठी होत असलेल्या निवडणुकीसाठी सोसायटी गटात सर्वसाधारण एकूण ८१ तर ग्रामपंचायत गटातून ४८, व्यापारी गटात १३. हमाल मापारी गटात ७ असे एकूण १४९ उमेदवारांनी  अर्ज दाखल केले.  उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या मध्ये माजी सभापती तेज कवडे, विलासराव आहेर, मविप्रचे संचालक अमित पाटील, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष विजय पाटील, अनंत इनामदार, एकनाथ सदगीर, उदय पवार, समाधान पाटील, कैलास पाटील, दर्शन आहेर, अॅड. अमोल आहेर, राजेंद्र देशमुख, उदय पवार, अमित नहार, बंडू पाटील, पुंजाराम जाधव, अलकाताई कवडे, मंगलाताई काकळीज, भाऊसाहेब पाटील, यज्ञेश कलंत्री, बाळकाका कलंत्री, सोमनाथ घोंगाणे, संजय सानप, मुकुंद खैरनार, नूतन कासलीवाल, गोकूळ कोठारी, अमोल नावंदर, भास्कर कासार, नीलेश हिप्पर, नितीन कवडे, सचिन हिरे, राजेंद्र लाठे, शिवाजी बच्छाव, नलिनी बोरसे, अमित बोरसे, बेबीताई पगार, चंद्रकला वाकळे, हरेश्वर सुर्वे, कैलास गायकवाड, भागवत बाबळे, धोंडीराम काळे, आदीउमेदवरांचाही अर्ज करणाऱ्यांमध्ये समावेश आहे. दाखल आज दाखल झालेल्या उमेदवारी अर्जाची छाननी ५ एप्रिलला होणार असून त्यात किती अर्ज अवैध ठरतात हा उत्सुकतेचा भाग आहे. माघारीसाठी मोठा अवधी देण्यात आला आहे. २१ एप्रिलला चिन्ह वाटप होईल या नंतर पॅनलच्या निर्मितीची घोषणा पॅनेल प्रमुख करतील.

No comments:

Post a Comment

नांदगावच्या कासलीवाल प्राथमिक विद्यालयात वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात संपन्न ! विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबत खेळाकडे गांभीर्याने पाहण्याची काळाजी गरज,

नांदगाव (प्रतिनिधी ) -  शिक्षणाच्या जोडीला आरोग्य, शिस्त आणि आत्मविश्वासाचे संस्कार रुजविणाऱ्या क्रीडांगणावर, श्री....