Sunday, March 12, 2023

आमदार सुहास कांदे यांच्या पाठपुराव्यामुळे यंदाच्या अर्थसंकल्पात नांदगाव विधानसभा मतदारसंघासाठी २१२ कोटींची कामे मंजूर,




    नांदगाव (प्रतिनिधी)  -  अर्थसंकल्प २०२३ मध्ये नांदगाव विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागातील रस्ते पूल यावर लक्ष केंद्रित करत पाठपुरावा केला असता , तब्बल २१२ कोटींची कामे मंजूर करून घेण्यात यश मिळवले.     
           नांदगाव मतदार संघातील रस्ते मोठ्या प्रमाणात खराब झाले होते . तसेच अनेक रस्त्यांवर पुल नसल्यामुळे वाहनधारकांना व नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते.  पावसाळ्याच्या कालावधीत नदी नाल्यांना पूर आल्यामुळे वाहतूक बंद होऊन अनेक गावे व वाड्या वस्त्यांचा संपर्क तुटत होता. त्यामुळे रस्त्यावर पूल बांधणे रस्त्यांची सुधारणा होणे आवश्यक होते. यासाठी आमदारांनी अर्थसंकल्पामध्ये रस्त्यांचे व पुलांचे कामासाठी निधी मंजूर करण्यासाठी पाठपुरावा केला. त्या अनुषंगाने नांदगाव मतदार संघातील राज्य मार्ग प्रमुख जिल्हा मार्ग इतर जिल्हा मार्ग व ग्रामीण मार्ग रस्त्यांची सुधारणा व पुलांच्या कामासाठी मोठा निधी मंजूर करण्यात आला .त्यापैकी नांदगाव तालुक्यात ७९ कोटी दहा लक्ष निधी मंजूर करण्यात आला असून, राज्य मार्ग व प्रमुख जिल्हा मार्ग रस्त्यांसाठी ३२ कोटी ६५ लक्ष तर इतर जिल्हा मार्ग व ग्रामीण मार्ग रस्त्यांसाठी ४५ कोटी ४५ लक्ष निधी मंजूर करण्यात आला आहे. नांदगाव विधानसभा मतदार संघातील व मालेगाव तालुक्यातील रस्त्यांसाठी १२४ कोटी निधी मंजूर करण्यात आला आहे. 
   रस्त्यांच्या व पुलांच्या कामांमुळे शेतकऱ्यांना बाजारपेठेत शेतीमाल ने आण करण्यासाठी तसेच नागरिकांना दळणवळणाच्या दृष्टिकोनातून सोयीस्कर होणार असल्याने जनतेमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे.


No comments:

Post a Comment

नांदगाव तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिन साजरा,

नांदगाव (प्रतिनिधी ) - मराठी पत्रकारीतेचे जनक आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमित्ताने दि.६ ...