नांदगाव ( प्रतिनिधी) - नांदगाव येथील शिवकन्या संगीता सोनवणे यांना जळगाव येथील वसुनंदिनी फाउंडेशन जामनेर संचलित एम के व्हेंचर जळगांव आणि साहित्य सरिता मंच तर्फे राज्यस्तरीय आदर्श महिला पुरस्कार २०२३ मिसेस युनिव्हर्स संगीत खैरनार व मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला.
सौ सोनवणे यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. याआधी पनवेल, मुंबई, ठाणे ,औरंगाबाद ,नांदेड, नाशिक आदी ठिकाणी राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले आहेत. नुकतेच नांदगाव नगर परिषदेच्या वतीने माझी वसुंधरा व स्वच्छ भारत अभियानचे ब्रँड आंबेसिडर म्हणुन त्यांची नियुक्ती केली आहे.सौ सोनवणे यांना मिळालेल्या या पुरस्काराची नांदगाव तालुक्यातील जनतेसह संपूर्ण जिल्ह्यातील शिवप्रेमीनी दखल घेतली असुन सर्व थरांतून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.सौ सोनवणे या कायम सामाजिक कार्यात अग्रेसर असतात शिवपूजा हा नित्यक्रम याशिवाय अनेक गरजूंना देखील कुठल्याही प्रकारची प्रसिद्धी न करता मदत करत असतात.
No comments:
Post a Comment