नांदगाव (प्रतिनिधी) - आज शनिवारी दि. ३० संध्याकाळी पाच वाजता प्रत्यक्ष नांदगाव कृषि उत्पन्न बाजार समितीच्या मतमोजणी पूर्ण झाली असुन, आतापर्यंत जाहीर झालेल्या निकालपैकी शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांच्या पॅनलला १५ जागा, एक जागा अपक्ष व दोन जागा महाविकास आघाडीच्या पारड्यात पडल्या आहेत. यामध्ये हमाल मापारी गटातील अपक्ष उमेदवार निलेश इप्पर हे विजयी झाले . ग्रामपंचायत गटातुन मराठा विद्या प्रसारक मंडळाचे संचालक अमित बोरसे (इतर मागास प्रवर्ग) हे निवडून आले. तर सोसायटी गटातून दर्शन आहेर हे निवडून आले आहेत. सुहास कांदे यांच्या पॅनलचे सोसायटी सर्वसाधारण गटाचे एकनाथ सदगीर , समाधान पाटील, साहेबराव पगार, कैलास पाटील, सतीश बोरसे, जीवन गरुड तर महिला राखीव अलकाताई कवडे, मंगला काकळीज हे निवडून आले. ग्रामपंचायत सर्वसाधारण गट अर्जुन पाटील, अनिल वाघ हे विजयी झाले. तसेच ग्रामपंचायत (आर्थिक दुर्बल घटक ) गटात दिपक मोरे , ग्रामपंचायत (अनुसूचित जाती जमाती) गटात अनिल सोनवणे तर व्यापारी गटातील यज्ञेश कलंत्री विजयी झाले असून , व्यापारी गटातील दुसऱ्या जागेसाठी अमोल नावदंर विजयी झाले आहेत.
No comments:
Post a Comment