सुहास पुणतांबेकर, प्रेसफोटोग्राफर
नांदगाव (प्रतिनिधी) - ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेचा मार्ग स्वीकारून आपली गुणवत्ता सिद्ध करावी. स्पर्धा परीक्षेसाठी लागणाऱ्या सर्व सुविधा पुरविण्यासाठी मविप्र समाज संस्था सदैव तयार आहे, असे प्रतिपादन मविप्र संचालक अमित बोरसे यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून केले. मविप्र समाज संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, नांदगाव येथील वार्षिक स्नेहसंमेलन व विद्यार्थी गुणगौरव पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला. या सोहळ्यासाठी नाशिक येथील सुप्रसिद्ध कवी रवींद्र मालुंजकर प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. त्यांनी आपल्या दिमागदार शैलीतून विविध कविता सादर केल्या व कवितांना आपल्या आयुष्यात किती महत्त्व आहे, याचे कवितांसह सादरीकरण केले. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून कनिष्ठ महाविद्यालय स्थानिक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सर्जेराव पाटील,प्रकाश पाटील,शरद पाटील व मविप्र सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक स्नेहसंमेलन प्रमुख डॉ.संजय मराठे यांनी केले. महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. एस. एन. शिंदे यांनी वर्षभरातील महाविद्यालयाच्या कामगिरीचा अहवाल सादर केला. गुणवत्ताधारक व स्नेहसंमेलन स्पर्धांच्या विजेतांना प्रमाणपत्र व रोख रक्कम अदा करण्यात आली. विविध व्यक्तींकडून देणगी स्वरूपात मिळालेल्या रकमेतून गरीब विद्यार्थ्यांना आर्थिक मदतीचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रवीण शार्दुल व श्रीमती वैशाली धूम , आभार प्रदर्शन सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा. आर. व्ही.वाघ यांनी केले.
No comments:
Post a Comment