नांदगाव (प्रतिनिधी) - नांदगाव बाजार समितीच्या सभापती व उपसभापती पदाची निवड संपन्न झाली. सभापतीपदी जातेगाव चे अर्जुन बंडू पाटील तसेच उपसभापतीपदी वेहेळगावचे पोपट सानप यांची निवड झाली.
आमदार सुहास अण्णा कांदे व ज्येष्ठ नेते बापूसाहेब कवडे यांनी नवनिर्वाचित सभापती व उपसभापती यांचे हार पुष्पगुच्छ व शाल श्रीफळ देऊन अभिनंदन केले.
याप्रसंगी बोलताना ज्येष्ठ नेते बापूसाहेब कवडे व आमदार सुहास आण्णा कांदे यांनी नवनिर्वाचित सभापती उपसभापती यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.बैठकीला समाधान पाटील, कैलास पाटील, सतीश बोरसे, दर्शन आहेर, साहेबराव पगार, जीवन गरुड, अलकाताई कवडे, मंगलाताई काकळीज, अमित बोरसे, अनिल वाघ, अनिल सोनवणे, यज्ञेश कलंत्री,
अमोल नावंदर, नीलेश इप्पर आदी उपस्थितीत होते. नवनिर्वाचित सभापती, उपसभापतींनी आभार मानत सर्वाना सोबत घेत शेतकरी हित डोळ्यासमोर ठेवत कारभार करण्याची ग्वाही दिली. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख किरण देवरे प्रमोद भाबड, माजी सभापती तेज कवडे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रमेश बोरसे, माजी नगराध्यक्ष राजेश कवडे, राजाभाऊ पवार, राजाभाऊ देशमुख, दत्तात्रेय निकम, डॉ. प्रभाकर पवार आदी उपस्थितीत होते.
No comments:
Post a Comment