नस्तनपुर , नांदगाव (प्रतिनिधी) – श्री क्षेत्र शनी महाराज मंदिर संस्थान नस्तनपूर येथे शनी महाराज जयंती निमित्ताने गाथा पारायण सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते .याप्रसंगी महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार लोकांनी ७ दिवस येथे कीर्तन सेवा दिली. त्यात ह.भ.प परिमल महाराज जोशी,इंद्रजीत रसाळ,चतुर महाराज शास्त्री,ज्ञानेश्वर महाराज तांबे,बाळासाहेब महाराज रंजाळे,सोपान दादा कन्हेर आदी लोकांनी कीर्तन सेवा केली. जन्मोत्सावाच्या पूर्वसंध्येला समाजप्रभोधनकार निवृत्ती इंदोरीकर महाराज यांचे कीर्तन झाले . या कार्यक्रमानिमित्त मंदिराची आकर्षक सजावट व मंदिर परिसरातील हिरवाईने नटलेला मंदिर परिसर कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरले. ह.भ.प वैराग्यमूर्ती तुकारक महाराज जेऊरकर यांच्या प्रेरणेने गेल्या २० वर्षापासून गाथा पारायण सोहळा संपन्न होत आहे. त्यांच्या काल्याच्या कीर्तनाने सदरील सदरील सोहळ्याची सांगता करण्यात आली.व्यासपीठ नेतृत्व ह.भ. प.ज्ञानेश्वर माऊली बेलदारवाडी, शंकर महाराज शास्त्री ,भीमराव महाराज शेवरे यांनी केले.दुपारील नैवद्य व महापुजेचा मान शिर्डी येथील सचिन अरविंद थोरात या दाम्पत्यांना मिळाला.महाप्रसादाचे आयोजन नागपूर येथील उद्योजक दीपक जैस्वाल यांच्या वतीने करण्यात आले होते.याप्रसंगी संस्थानचे अध्यक्ष मा.नारायण भाऊ अग्रवाल जन सेक्रेटरी मा.आ.अँड.अनिलदादा आहेर,विश्वस्त खासेराव सुर्वे उदय अप्पा पवार डॉ.शरद आहेर आदी उपस्थित होते कार्यकम यशस्वीतेसाठी गाथा पारायण उत्सव समिती सदस्यासह पंचक्रोशीतील भाविक भक्त आदी सहकार्य केले.
Subscribe to:
Post Comments (Atom)
नांदगाव येथील जे.टी. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूलचा सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेत घवघवीत यश!
नांदगाव (प्रतिनिधी ) - नांदगाव येथील जे. टि. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांचा CBSE केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंड...
-
नांदगाव (प्रतिनिधी) - नांदगाव येथे गेल्या महिन्यात पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याने शहरातील आठ वर्षीय चिमुकला भावेश दिपक भ...
-
नांदगाव ( प्रतिनिधी ) - नांदगाव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूकीसाठी सोमवारी (दि.१७ ) शेवटच्या दिवशी नगराअध्यक्षपदासाठी ९ उमेदवार...
-
नांदगाव ( प्रतिनिधी ) - नांदगावच्या लक्ष्मीनगर जवळील ढासे मळा येथील शाळा काही दिवसातच सुरू होत आहे . त्या निमित्ताने सामाजिक ...
No comments:
Post a Comment