नांदगाव (प्रतिनिधी) - नांदगाव नगरपरिषद येथे आमदार सुहास कांदे यांच्या उपस्थितीत शासन आपल्या दारी या अंतर्गत लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ देण्यात आला. नांदगाव नगरपरिषद्वारा आयोजित शासन आपल्या दारी या उपक्रमांतर्गत शहरातील १०७ दिव्यांग लाभार्थ्यांना आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या हस्ते धनादेश वितरित करण्यात आला. बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेद्वारा राजगीर ,सर्वज्ञ, सप्तशृंगी, गौरी या बचत गटांना प्रत्येकी रुपये १५००००/- चे धनादेश वितरित करण्यात आले. नसीब, सोनचाफा ,व सिल्की या बचत गटांना आयसीआयसीआय बँक द्वारा प्रत्येकी पाच लाखाचे धनादेश वाटप करण्यात आले. प्रधानमंत्री पथविक्रेता योजना या योजनेअंतर्गत बँक ऑफ महाराष्ट्र, स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र ग्रामीण बँक ,बँक ऑफ बडोदा, युनियन बँक इत्यादी बँकेद्वारा आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या हस्ते ५५ लाभार्थ्यांना धनादेश वितरित करण्यात आले. ५ लाभार्थ्यांना प्रधानमंत्री पथविक्रेता योजनेअंतर्गत परिचय बोर्डाचे वाटप करण्यात आले. तसेच दारिद्र्य रेषेखालील दाखल्यांचे वितरण करण्यात आले. महाराष्ट्र ग्रामीण बँक द्वारा पथविक्रेत्यांना छत्री वाटप करण्यात आले.अंजुमताई कांदे, माजी नगराध्यक्ष राजेश कवडे, तहसीलदार सिद्धार्थ मोरे, गटविकास अधिकारी चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत धनादेश वितरित करण्यात आले. या कार्यक्रमाप्रसंगी बँक ऑफ महाराष्ट्राचे शाखाधिकारी हनुमंते, महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे शाखाधिकारी जयंत अमृतकर मुक्ता कांदे प्रशासकीय अधिकारी राहुल कुटे कर निरीक्षक विजय कायस्थ, रविन्द्र चोपडे, सुनील पवार, विजया धनवट, बिजला गंगावणे आदी उपस्थित होते. .
कार्यक्रमाचे प्रास्ताविक . विवेक धांडे प्रशासक तथा मुख्याधिकारी यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आनंद महिरे (सहायक प्रकल्प अधिकारी) यांनी केले.
No comments:
Post a Comment