नांदगाव (प्रतिनिधी) - आज बुधवार दि. २१ जुन हा 'जागतिक योगदिन' म्हणुन संपूर्ण जगात साजरा करण्यात येतो. आपल्या आरोग्यासाठी योग प्राणायाम करणे गरजेचे आहे . यासाठी अनेक शाळेत कॉलेज यासह अनेक संस्थामध्ये योग करणे अनिवार्य करण्यात आले आहे नागरिकांनी योग साधनेकडे वळावे यासाठी योग शिक्षक अनेक नानाविध उपाय करत असतात. असाच एक अवलिया आहे बाळासाहेब मोकळ हा गेल्या २० वर्षांपासून योग साधना करतो. योग शिक्षक म्हणुन कार्यरत असतांना देखील नागरिकांनी योगसाधना करण्यासाठी व त्याची जनजागृती करण्यासाठी मोकळ धडपडत असतात आज होणाऱ्या जागतिक योग दिनाच्या निमिताने त्यांनी आज पूर्वसंध्येला झाडावर व मोटारसायकलवर योग प्राणायाम आसने करून दाखवली. याआधी त्यांना योग साधनांसाठी अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. नागरिकांनी योग साधनेकडे वळावे यासाठी आपण नवनवीन प्रयोग करत असतो असे मोकळ यांनी सांगितले.
Subscribe to:
Post Comments (Atom)
नांदगाव येथील जे.टी. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूलचा सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेत घवघवीत यश!
नांदगाव (प्रतिनिधी ) - नांदगाव येथील जे. टि. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांचा CBSE केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंड...
-
नांदगाव (प्रतिनिधी) - नांदगाव येथे गेल्या महिन्यात पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याने शहरातील आठ वर्षीय चिमुकला भावेश दिपक भ...
-
नांदगाव ( प्रतिनिधी ) - नांदगाव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूकीसाठी सोमवारी (दि.१७ ) शेवटच्या दिवशी नगराअध्यक्षपदासाठी ९ उमेदवार...
-
नांदगाव ( प्रतिनिधी ) - नांदगावच्या लक्ष्मीनगर जवळील ढासे मळा येथील शाळा काही दिवसातच सुरू होत आहे . त्या निमित्ताने सामाजिक ...
No comments:
Post a Comment